पिंपरी चिंचवड मध्ये कोरोनामुळे ८१ जणांचा मृत्यू…

    पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 2 हजार 473 आणि महापालिका हद्दीबाहेरील 130 अशा 2 हजार 603 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (शनिवारी) नोंद झाली. तर, 81 जणांचा मृत्यू झाला आहे. ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयात हद्दीत सर्वाधिक 473 रुग्ण सापडले आहेत.

    उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 1417 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरातील 49 आणि महापालिका हद्दीबाहेरील 32 अशा 81 जणांचा आज मृत्यू झाला. त्यात 57 पुरुष आणि 24 महिला रुग्णांचा समावेश आहे. मागील चोवीस तासात 12 मृत्यू झाले आहेत. यापूर्वी मृत्यू झालेल्या केसेस आज कळविल्यामुळे मृत्यूचा आकडा वाढला असल्याचे वैद्यकीय विभागाने सांगितले.

    शहरात आजपर्यंत 1 लाख 98 हजार 402 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 1 लाख 70 हजार 652 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 2610 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 1182 अशा 3792 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला.

    सध्या 8 हजार 300 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर, 8 हजार 144 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत 3 लाख 52 हजार 713 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.