अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या एमपीएससीच्या विद्यार्थ्याचा कोरोनाने मृत्यू

    पुणे: राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येनं कहर माजवला आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेसह सर्वांचेच त्रेधातिरपट झाले आहे. कोरोनाच्या संक्रमणामुळे अनेकांना आप[आला जीव गमवावा लागला आहे. अशातच स्पर्धापरीक्षे द्वारे अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या विद्यार्थ्याचा कोरोनाच्या संक्रमणामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

    श्रींगोद्या तालुक्यातील वैभव शितोळे असे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एमपीएससीच्या विद्यार्थ्याचे नाव आहे. इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याने स्पर्धा परीक्षा देण्याचे ठरवले. स्पर्धा परीक्षा हे एकमेव उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवत त्यात वैभवने स्वतःला पूर्णपणे झोकून तयारी सुरू ठेवली होती. मागील पाच ते सहा वर्षांहून अधिक काळ त्याची परीक्षांची तयारी करत होता. परंतु अधिकारी होण्याआधीच कोरोनाच्या विळख्यात सापडल्याने त्याला आपला जीव गमवावा लागला.

    कोरोना संकट भयानक असतानाहीपरीक्षा तोंडावर आल्याने  अनके विद्यार्थी आपला जीव धोक्यात घालून परीक्षेची तयारी करत आहेत. इतकेच नव्हेतर अनके विद्यार्थी सर्दी, ताप, खोकला या कोरोनाच्या लक्षणाकडेही दुर्लक्ष करताना दिसत आहेत.