जुन्नर तालुक्‍यातील कोरोना रुग्णसंख्या ५८

जुन्नर : ओतूर पोलीस ठाण्याचे अधिकारी तसेच जुन्नर, वारुळवाडी, विठ्ठलवाडी-येणेरे व संतवाडी-आळे व येथे कोरोनाबाधित एकूण पाच रुग्ण आढळून आल्याने तालुक्‍यातील एकूण रुग्णसंख्या ५८ झाली. यापैकी ३२ जण बरे झाले आहेत.

 रुग्णसंख्या वाढत असल्याने चिंता वाढली

जुन्नर : ओतूर पोलीस ठाण्याचे अधिकारी तसेच जुन्नर, वारुळवाडी, विठ्ठलवाडी-येणेरे व संतवाडी-आळे व  येथे कोरोनाबाधित एकूण पाच रुग्ण आढळून आल्याने तालुक्‍यातील एकूण रुग्णसंख्या ५८ झाली. यापैकी ३२ जण बरे झाले आहेत. तर २४ जण उपचार घेत आहेत. औरंगपूर व मोकासबाग येथील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.
लेण्याद्री येथील कोविड केंद्रात १७, तर पुणे येथे ७ जण उपचार घेत आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांपासून तालुक्‍यातील रुग्णसंख्या वाढत असल्याने चिंता देखील वाढत चालली आहे. जुन्नर शहरात दुसरा रुग्ण आढळून आला आहे. उंब्रज, ओतूर, आळे व सावरगाव येथील रुग्णांच्या संपर्कातील एकूण ३२ जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.