भिगवण परिसरात  कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने खळबळ

रावणगाव :    पुणे शहर व जिल्ह्याच्या आसपासच्या भागात कोरोनाने धुमाकूळ घातला असतानाच इंदापूर मध्ये एकही रुग्ण नसल्याने इंदापूर तालुका  सेफ झोन समजला जात होता  मात्र  इंदापूर तालुक्यातील भिगवण परिसरामध्ये एक रुग्ण  आढळल्याने  लोकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे .

             भिगवण स्टेशनमधील एका महिलेस कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.भिगवण प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित उदावंत यांनी सांगितले की,  बारामती येथे उपचारासाठी गेलेल्या या महिला रुग्णास कोरोनाची लागण झाली आहे. दोन दिवसांपूर्वी हा रुग्ण पुण्यात उपचारासाठी दाखल केल्यानंतर त्याच्या घशातील द्रवाचे नमुने घेण्यात आले होते. तेथे तपासणी केल्यानंतर या रुग्णास कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. महिला रुग्ण या घरकाम करत असून मुलगा चालक असून त्यांच्या संपर्कात येणाऱ्यांना होम क्वॉरंटाईन करण्यात येणार आहे. दरम्यान भिगवण स्टेशन परिसर प्रशासनाच्यावतीने सील करण्यात आला आहे. 
       शेजारील  बारामती तालुक्यात कोरोना रुग्ण आढळला, मात्र इंदापूर तालुक्यात कोरोनाचा रुग्ण नसल्याने दिलासा होता  मात्र आज पर्यंत म्हणजे जवळपास १४ दिवस बारामती शहरात एकही कोरोनाची लागण झालेला एकही रुग्ण आढळला नसल्याने बारामती करोना मुक्त होण्याच्या मार्गावर असतानाच आज इंदापूरमध्ये मध्ये कोरोना खाते उघडल्याने आता पुन्हा चिंतेचे काहूर निर्माण झाले आहे.