पिंपरी : केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सुचनेनुसार पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम येत्या (रविवारी) होणार नाही. ती पुढे ढकलण्यात आलेली आहे. राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेची पुढील तारीख प्राप्त झाल्यानंतर कळविण्यात येईल असे, महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

शासन आदेशानुसार राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम १७ जानेवारी २०२१ रोजी आयोजित करण्यात आलेली होती. परंतु, १७ जानेवारी २०२१ रोजी होणारी पल्स पोलिओ लसीकरण मोहिम पुढील सूचना येईपर्यंत पुढे ढकलण्यात येत आहे. अशी माहिती भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या लसीकरण विभागाचे सल्लागार प्रदिप हलदार यांनी ९ जानेवारी २०२१ रोजीच्या परिपत्रकाव्दारे दिली आहे.
त्यामुळे शासन आदेशानुसार पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम १७ जानेवारी २०२१ रोजी होणार नसून ती पुढे ढकलण्यात आलेली आहे. शासनाकडून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेची पुढील तारीख प्राप्त झाल्यानंतर प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविण्यात येईल.