Corona reduction in Pune is a good thing Priya Berde
पुण्यात कोरोना कमी होणे ही चांगली गोष्ट : प्रिया बेर्डे

कोरोना काळात आरोग्य कर्मचाऱ्यांनी केलेली सेवा हे आपल्यावरील उपकार आहेत. पुण्यात हळूहळू हा आजार कमी होणे चांगली गोष्ट आहे, असे सिने अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी सांगितले.

नवराष्ट्र न्यूज नेटवर्क, पुणे

कोरोना काळात आरोग्य कर्मचाऱ्यांनी केलेली सेवा हे आपल्यावरील उपकार आहेत. पुण्यात हळूहळू हा आजार कमी होणे चांगली गोष्ट आहे, असे सिने अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी सांगितले.

हा सत्कार उत्साह वाढविणारा आहे. मला बोलविल्याबद्दल धन्यवाद, पुढील वर्षी जोरात कार्यक्रम करू, मला बोलवा मी येईन. मास्क, सॅनिटायजर आणि सोशल डिस्टनसिंग पाळा. येणारे सण सोशल डिस्टनसिंग पळून करा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

वारजे परिसरात गौरी सजावट स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्याचा बक्षीस वितरण समारंभ आज सकाळी आयोजित केला होता. कोरोना योध्दा, पोलीस अधिकारी, डॉक्टर, पत्रकार, मनपा अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. वारजे परिसरातील ॲम्बुलन्स चालकांना पीपीईकिट ही यावेळी वाटप करण्यात आले. सिने अभिनेत्री प्रिया बेर्डे, संयोजक बाबा धुमाळ, विरोधी पक्षनेत्या दिपाली प्रदीप धुमाळ यावेळी उपस्थित होत्या. मॅजेस्टिक हॉल, व्हायोला सोसायटी चौक वारजे हायवे येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

दीपाली धुमाळ म्हणाल्या, या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांनी काळजी घ्यावी. पुण्यात परिस्थितीत अत्यंत गंभीर होत चालली आहे. आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, पत्रकार यांनी चांगले काम केले. मी, माझे पती आणि माझ्या मुलानेही कोरोनावर मात केली आहे. या अजराची भीती न बाळगता काळजी घ्यावी. कोरोना गेला असे नाही, रुग्ण कमी झाले आहेत. दसरा, दिवाळी या काळात विशेष काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील ७ ते ८ महिन्यांपासून रात्रंदिवस काम करणाऱ्या वारजे-कर्वेनगरच्या आरोग्य निरीक्षक नंदा प्रताप यांना सत्कार कार्यक्रम दरम्यान त्या खाली पडल्या. त्यावेळी सिने अभिनेत्री प्रिया बेर्डे, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, बाबा धुमाळ यांनी तातडीने समयसुचकता दाखवून त्यांना जवळच बसण्याची विनंती केली. निलेश धानापुणे यांनी सूत्रसंचालन केले. वारजे हायवे परिसर विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष निवृत्ती येनपुरे यांनी आभार मानले.