कोरोनाचा रिपोर्ट देतात पण… कोरोना टेस्ट करणाऱ्या लॅब पुणे पालिकेकडून सील

कोरोनाची चाचणी करणाऱ्या या लॅबकडून नागरिकांची अपूर्ण माहिती दिली जाते. लॅबच्या या चुकांमुळे जवळपास 30 टक्के रुग्णांचा शोध घेण्यात अडचणी येत असून त्यांच्या संपर्कातील लोकांचा शोधच लागत नाही. त्यामुळे रुग्णसंख्या वाढत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

    पुणे : कोरोना टेस्ट करणाऱ्या लॅबच्या चुकांचा फटका आरोग्य यंत्रणेला बसत आहे. यामुळे कोरोना टेस्ट करणाऱ्या लॅब पुणे पालिकेकडून सील करण्यात आल्या आहेत.

    कोरोनाची चाचणी करणाऱ्या या लॅबकडून नागरिकांची अपूर्ण माहिती दिली जाते. लॅबच्या या चुकांमुळे जवळपास 30 टक्के रुग्णांचा शोध घेण्यात अडचणी येत असून त्यांच्या संपर्कातील लोकांचा शोधच लागत नाही. त्यामुळे रुग्णसंख्या वाढत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

    त्यामुळे शहरातील तीन लॅबची कोविड चाचणी यंत्रे सील करण्यात आली आहेत. पुणे महापालिकेच्या अतिरीक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी ही कारवाईची माहिती दिली. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.