भोरमध्ये सापडला कोरोनाचा नवीन रूग्ण

भोर :तालुक्यातील रायरी येथे गुरूवारी दुपारी छत्तीस वर्षाचा एक पॉझिटिव्ह रूग्ण आढळला असून त्याच्यावर पुणे येथील रूग्णालयांत उपचार सुरू असल्याचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव यांनी सांगितले.त्यामुळे

भोर :तालुक्यातील रायरी येथे गुरूवारी दुपारी छत्तीस वर्षाचा एक पॉझिटिव्ह रूग्ण आढळला असून त्याच्यावर पुणे येथील रूग्णालयांत उपचार सुरू असल्याचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव यांनी सांगितले.त्यामुळे तालुक्यातील एकूण बाधीत रूग्णांची संख्या पांच झाली असून चारजणांनी करोनावर मात केली आहे.नवीन आढळलेला रूग्ण आपल्या कुटुंबासह मुंबईवरून शनिवारी रायरी येथे आला होता.प्रशासनाने त्या सर्वांच्या आरोग्य तपासणीनंतर त्यांचे प्राथमिक शाळेत विलगीकरण केले होते.मंगळवारी सदर रूग्णांला सर्दी,पडसे,ताप अशी लक्षणे दिसून आली.त्यामुळे तातडीने तपासणीसाठी पुण्याला खाजगी रूग्णालयात दाखल केले.आज दुपारी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. अहवाल प्राप्त होताच प्रशासकीय यंत्रणेने रायरीपासून तीन किलोमीटरचा परीसर सील केला आहे.त्याच्या संपर्कातील लोकांचा शोध सुरू असून त्यांना तपासणीसाठी पुण्याला नेण्यात येणार असल्याचे तालुका वैदयकीय अधिकारी डॉ.सुनिल क-हाळे यांनी सांगितले. चार दिवसापासून तालुका करोनामुक्त झाल्याचा दावा समाज माध्यमांमध्ये सुरू असतानाच नवीन रूग्ण सापडल्यामुळे पुन्हा तालुक्यात चिंतेचे वातावरण झाले आहे.

वेल्हयातील अहवाल निगेटिव्ह. वडगांव झांजे येथील संशयीत तीसपैकी एकोणतीस जणांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याचे तहसीलदार शिवाजी शिन्दे यांनी सांगितले.राहीलेला एकाचा तपासणी अहवाल शुक्रवारी येणेअपेक्षित असून सध्या पुण्यात आठरा रूग्णांवर उपचार सुरू असल्याचे त्यांनी सागितले.