कोरोना सोडेना शिक्रापूर परीसराची पाठ

शिवतक्रार म्हाळुंगीतील एका युवकाला कोरोनाची लागण शिक्रापूर :देशभरात कोरोना या संसर्गजन्य रोगाने थैमान घातलेले असताना आणि त्यामुळे संपूर्ण राज्य हादरून गेलेले आहे. शिरूर तालुक्यातील शिक्रापूर,

शिवतक्रार म्हाळुंगीतील एका युवकाला कोरोनाची लागण
शिक्रापूर :
देशभरात कोरोना या संसर्गजन्य रोगाने थैमान घातलेले असताना आणि त्यामुळे संपूर्ण राज्य हादरून गेलेले आहे. शिरूर तालुक्यातील शिक्रापूर, सणसवाडी, विठ्ठलवाडी, तळेगाव ढमढेरे येथे काही इसमांना कोरोनाची लागण झाल्याचे यापुर्वी समोर आले होते. तर एका कोरोना पॉझेटीव्ह व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याची घटना घडली होती त्यांनतर तळेगाव ढमढेरे येथील एका महिलेचा मृत्यू होईन तिच्या कुटुंबातील तिघांना कोरोनाची लागण झालेली असताना आता शिवतक्रार म्हाळुंगी येथील एका युवकाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले असल्याने शिरूर तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून संपूर्ण शिरूर तालुका हादरून गेला आहे.
-परिसरात ग्रामपंचायतच्या वतीने फवारणी सुरु
शिवतक्रार म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील एका चोवीस वर्षीय युवकाला काही कारणास्तव उपचारासाठी शिक्रापूर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दहा मे रोजी दाखल केले होते.सदर हॉस्पिटलमध्ये चार दिवस उपचार करण्यात आले त्यांनतर त्याला पुणे येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असताना पुणे येथील डॉक्टरांना त्यामध्ये काही संशय आल्याने त्यांनी सदर रुग्णाची कोरोना तपासणी करण्याचा निर्णय घेत त्याची तपासणी केली असताना त्याचा कोरोना अहवाल पॉझेटीव्ह आला असल्याचे समोर आले आहे. त्यांनतर एकाच खळबळ उडाली असून शिक्रापूर सह संपूर्ण शिरूर तालुका हादरून गेला आहे. याबाबत माहिती प्राप्त होताच शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र शिंदे, तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रज्ञा घोरपडे, आरोग्य पर्यवेक्षक जालिंदर मारणे, जिल्हा परिषद सदस्या रेखा बांदल, बाजार समितीचे संचालक विकास शिवले, ग्रामविकास अधिकारी नंदकुमार वैद्य, तलाठी अमोल थिगळे यांसह आदींनी शिवतक्रार म्हाळुंगी येथे धाव घेत परिसरात ग्रामपंचायतच्या वतीने फवारणी सुरु केली असून सदर युवकाच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींची माहिती काढण्याचे काम प्रशासनाकडून हाती घेण्यात आले आहे. तर यावेळी प्रशासनाकडून शिवतक्रार म्हाळुंगी येथे कोरोना बाधित युवक आढळून आलेल्या ठिकाणाजवळील काही परिसर पूर्णपणे बंद करण्यात आला असून त्या ठिकाणी देखील औषध फवारणी करण्यात आली आहे तसेच येथे आरोग्य अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या वतीने वेगवेगळ्या तपासण्या करण्यात येणार असून नागरिकांचा सर्वे करण्याचे काम देखील सुरु करण्यात आले आहे.

सदर युवकांच्या संपर्कातील अकरा व्यक्तींची तपासणी : डॉ. प्रज्ञा घोरपडे
शिवतक्रार येथील युवकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याने उपचार घेतलेच्या शिक्रापूरच्या हॉस्पिटलमधील डॉक्टर व इतर तीन व्यक्ती आणि त्या युवकाच्या कुटुंबातील सात व्यक्तींचे स्व्याब तपासणीसाठी असल्याचे तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रज्ञा घोरपडे यांनी सांगितले.

संपर्कातील इतर व्यक्तींची माहिती घेण्याचे काम सुरु : डॉ. राजेंद्र शिंदे

शिवतक्रार म्हाळुंगी ता. शिरूर येथील एका इसमाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कातील अकरा व्यक्तींना होम क्वारंटाईन केले असून त्या युवकाच्या संपर्कातील इतर व्यक्तींची माहिती घेण्याचे काम सुरु असल्याचे शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र शिंदे आहे.