नारायणगाव येथे मुंबईहून आलेल्या कोरोना संशयित ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

-२ जण लेण्याद्री कोविड केंद्रात दाखल नारायणगाव : नारायणगाव येथील कोल्हेमळा येथे ७५ वर्षीय कोरोना संशयित ज्येष्ठ नागरिकाचा

-२ जण लेण्याद्री कोविड केंद्रात दाखल                 

नारायणगाव : नारायणगाव येथील  कोल्हेमळा येथे ७५ वर्षीय  कोरोना संशयित ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू काल दि. ३० सायंकाळी ६  वाजता झाला. दरम्याने या व्यक्तीच्या पत्नी व मुलीला लेण्याद्री येथील कोविद केंद्रात उपचारासाठी आज दाखल केले आहे , अशी  माहिती वैदयकीय आधिकारी डॉ वर्षा गुंजाळ व सरपंच योगेश पाटे यांनी दिलीआहे .  

मृत व्यक्ती मुंबई येथील भटवाडी घाटकोपर येथून तीन  दिवसापूर्वी कोल्हे मळ्यातील कावळे यांच्या सोसायटीमध्ये राहण्यासाठी आली होती.  ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे त्यांची पत्नी व मुलगी असे तीन जण हे तीन दिवसापूर्वी  नारायणगाव परिसरातील कोल्हेमळा येथील एका सोसायटीमध्ये राहण्यासाठी आले होते. आल्यानंतर त्यांनी दि २८ तीन  दिवसापूर्वी  नारायणगाव ग्रामपंचायतमध्ये  येऊन मुंबईहून आल्याची  माहिती देऊन नोंद केली होती .  त्यामुळे त्यांना  १४ दिवस होम क्वाराटाईन करण्यात आले होते .यादरम्यान त्यांनी मुंबईहुन येतानाच ताप असल्याची माहिती  ग्रामपंचायत व आरोग्य विभागापासून  लपविली होती.  ही घटना झाल्यावर त्यांच्या कुटूंबियांनी त्यांना मुंबईलाच  ताप होता व त्याचे रिपोर्ट सोबत घेऊन आम्ही तीन जण नारायणगावला आलो होतो,   अशी माहिती डॉ वर्षा गुंजाळ यांना दिली.