सहाय्यक पोलिस आयुक्तांना कोरोना

पुणे: शहर पोलिस दलातील एका सहाय्यक पोलिस आयुक्तांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले आहे. कोरोनासदृश्य लक्षणे दिसल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह

पुणे:  शहर पोलिस दलातील एका सहाय्यक पोलिस आयुक्तांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले आहे. कोरोनासदृश्य लक्षणे दिसल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या वृत्ताला वरिष्ठ अधिकाऱ्यांनीदेखील दुजोरा दिला आहे. त्यामुळे आता पोलिस आयुक्तालयातदेखील कोरोनाने एन्ट्री केली असल्याचे दिसून येते. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांची तपासणी करण्यात येणार आहे.कोरोना संसर्ग झालेले पोलिस अधिकारी हे आयुक्तालयात बसतात. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सर्व प्रकारची प्रतिबंधात्मक काळजी पोलिस प्रशासनाकडून घेतली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आत्तापर्यंत शहर पोलिस दलातील ५२ जणांना कोरोना संसर्ग झाला असून २७ जणांनी उपचारानंतर कोरोनावर मात केली आहे. तर दोघांचा मृत्यू झाला आहे.