भारतात जानेवारीपासून होणार कोरोना लसीकरणाची सुरुवात, सीरमच्या आदर पूनावालांनी दिले हे संकेत

भारत सरकारसोबतच अन्य बाजारांसाठीही सिरम कोरोना लस बनवत आहे. पुढील वर्षी जुलैपर्यंत ३० ते ४० कोटी डोस केंद्र सरकारला खरेदी करायचे आहेत. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या योजनेनुसार देशातील २० ते ३० टक्के लोकसंख्येला कोरोना लस टोचायची आहे.

पुणे : देशात कोरोना लस उपलब्ध करण्यात आली असून देशातील जनतेला लवकरच कोरोना लस दिली जाणार असल्याचे संकेत कोरोना उत्पादक कंपनी सीरम इन्स्टिट्यूटच्या सीईओ आदर पूनावाला ( Adar Poonawala ) यांनी दिली आहे. सीरमने कोरोना लसीच्या (Corona vaccination) आपात्कालीन वापरासाठी परवानगी मागितली आहे. ही परवानगी पुढील १५ दिवसांत मिळण्याची शक्यता आहे. असेही आदर पूनावाला यांनी म्हटले आहे.

एका ग्लोबल बिझनेस समिटला संबोधित करताना अदर पुनावाला यांनी ही माहिती दिली. आम्हाला आशा आहे की एसआयआयला कोरोना लसीचे लायसन या महिन्याच्या शेवटी मिळू शकते. पण, त्याच्या वापराची मंजुरी नंतर मिळेल. सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर भारतात जानेवारी २०२१ पासून कोरोना लसीकरण अभियान सुरु केले जाईल. सिरम इन्स्टिट्यूटने ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ब्रिटनची एस्ट्राझेनेकासोबत मिळून ही लस विकसित केली आहे.

भारत सरकारसोबतच अन्य बाजारांसाठीही सिरम कोरोना लस बनवत आहे. पुढील वर्षी जुलैपर्यंत ३० ते ४० कोटी डोस केंद्र सरकारला खरेदी करायचे आहेत. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या योजनेनुसार देशातील २० ते ३० टक्के लोकसंख्येला कोरोना लस टोचायची आहे. देशातील जास्तीत जास्त लोकसंख्येला पुढील वर्षी ऑक्टोबरपर्यंत कोरोना लस दिली जाणार आहे. तेव्हाच लोकांचे आयुष्य पूर्वीसारखे सामान्य होणार आहे.

पुनावाला यांनी म्टले आहे की, कोरोना लस व्यक्तीचे कोरोनापासून संरक्षण करण्याबरोबरच संक्रमण थांबविण्यास प्रभावी आहे की नाही ते अद्याप तरी स्पष्ट झालेले नाही. तसेच याची काही कल्पना आपल्याला देखील नाही. जेव्हा कोरोना लस देशातील २० टक्के लोकसंख्येला मिळेल तेव्हाच लोकांमध्ये विश्वास परतेल. पुढील वर्षी सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये प्रत्येक व्यक्तीसाठी कोरोना लस उपलब्ध होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले आहे.