पुण्यातून कोरोना हद्दपार करायचा आहे : अजित पवार

पुणे : पुणेकरांनी ठरविले तर ते काहीही करू शकतात. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार कोरोना दुसरी लाट येणार असल्याचे सांगत आहेत. मात्र, हा अंदाज आपल्याला खोटा ठरवून पुण्यातून कोरोना हद्दपार करायचा आहे, असा निर्धार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केला.

पुणे : पुणेकरांनी ठरविले तर ते काहीही करू शकतात. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार कोरोना दुसरी लाट येणार असल्याचे सांगत आहेत. मात्र, हा अंदाज आपल्याला खोटा ठरवून पुण्यातून कोरोना हद्दपार करायचा आहे, असा निर्धार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केला.

महाराष्ट्र शासन व पुणे महानगरपालिका परिवहन महामंडळ लि. यांच्या संयुक्त विद्यमानाने कोविड – 19 जनजागृती कार्यक्रमा अंतर्गत माझे कुटुंब माझी जबाबदारी पुण्याचा निर्धार कोरोना हद्दपार या अभियानाची सुरुवात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज करण्यात आली. Pmpml च्या मध्यवर्ती कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी – चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, संचालक शंकर पवार, विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ, व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप यावेळी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, माझी कुटुंब माझी जबाबदारी याला मोठे यश मिळत आहे. आता आपण दुसऱ्या टप्प्यात जात आहे. आपल्याला पुणे कोरोनामुक्त करायचे आहे. पुणेकरांनी त्याला साथ द्यावी. 1 वर्षांपूर्वी असा काही आजार येऊन लॉकडाऊन करावे लागेल, सर्व काही बंद करावे लागेल, असे म्हटले असते तर त्याला वेड्यात काढले असते. पुण्यात सोशल डिस्टनसिंग, मास्क, सॅनिटायजरचा वापर झाला नाही. त्यामुळे पुणे, पिंपरी – चिंचवड, जिल्ह्यात संपूर्ण देशात कोरोना वाढला. तर, केरळ राज्याने वेळीच उपाययोजना करून हा आजार आटोक्यात आणला. सुरुवातीला लोक या अजाराची माहिती देत नव्हते. कोरोनाचा मुकाबला करून अर्थव्यवस्था मजबूत करवी लागेल. दिवाळी पर्यंत शाळा सुरू होऊ शकत नाही, इतर राज्यात शाळा सुरू केल्यावर त्याचा परिणाम वाईट झाला. जंबो हॉस्पिटल उभारावे लागले. बेडस, ऑक्सिजन बेडस मिळत नव्हती, वेळेवर उपचार केले नाही. दुर्लक्ष केल्याने त्याची जबरदस्त किंमत मोजावी लागली. कोरोना दुसरी लाट थांबविण्यासाठी प्रयत्न करतोय. कोरोना संपलाय असे समजायचे कारण नाही. पांडुरंग दर्शन, मुस्लीम बांधवांचा सण, वारी बंद करावी लागली. दसरा, दिवाळी तोंडावर आहे. हे संकट आपल्याला दूर करायचे आहे. पुणेकरांनी गंभीरपणे कोरोनाला घ्यावे. पूर्वी डिझेल बस, आता सीयनजी बसेस आल्या आहेत. Pmpml मध्ये जसे प्रवासी पाहिजे, तसे मिळत नाहीत. मोठ्या प्रमाणावर घरा बाहेर पडु नये. वाहक – चालक सर्वांची काळजी घेतात. नवरात्र साधेपणा ने साजरे करा. मागील काही दिवसांपासून 1 – 1 गोष्ट anlok करतोय. पुणेकरांनी ठरविले तर काहीही करू शकतात. पुण्यातून कोरोना आपल्याला हद्दपार करायचे आहे. तज्ज्ञांचा अंदाज आपल्याला खोटा ठरवायचा आहे. राजेंद्र जगताप यांनी आभार मानले.

महापौर मोहोळ म्हणाले, राज्यातील पहिला रुग्ण पुण्यात सापडला. हे संकट आटोक्यात आणण्यासाठी केंद्र, राज्य आणि पुणे महापालिका प्रयत्न करीत आहे. रुग्ण कमी असले तरी कोरोना कमी झालेला नाही. त्यासाठी जनजागृती आवश्यक आहे. शहरात 1 लाख 55 हजार रुग्ण असले तरी 1 लाख 40 हजार रुग्ण बरे झाले आहेत. कोरोना संकट काळात pmpml कर्मचाऱ्यांनी 7 महिन्यात चांगले काम केले आहे. पुढील काळातही चांगले काम करायचे आहे. मास्क, सॅनिटायजर, सोशल डिस्टनसिंग पाळावे, असे आवाहनही त्यांनी केले.