दौंड पंचायत समितीमध्ये कोरोनाचा शिरकाव

गट विकास अधिकारी यांना कोरोनाची लागण
दौंड : दौंड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी गणेश मोरे यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे गुरुवार (ता.२७) रोजी निष्पन्न झाले असून दौंड पंचायत समितीच्या कार्यालयात कोरोनाने शिरकाव केला आहे.

गट विकास अधिकारी गणेश मोरे यांनी कोरोना काळात जनतेच्या सेवेसाठी खूप मेहनत घेतली आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांना योग्य उपचार उपलब्ध होण्यासाठी दिवसरात्र एक केले होते. वेळोवेळी आरोग्य विभागासोबत बैठका घेऊन कोरोना वर नियंत्रण ठेवण्यासाठी वेगवेगळे उपाय योजना राबविण्यात मोलाचे सहकार्य केले होते. तसेच दौंड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांना कोरोना झाली असल्याने कार्यालयातील अनेक शासकीय अधिकारी संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच पंचायत समितीचे सभापती व इतर पंचायत समिती सदस्य यांची कोरोना चाचणी केली जाणार असल्याचे आरोग्य अधिकारी यांनी सांगितले आहे. कोरोना योद्धा यांना कोरोनाची लागण झाली असल्याने अनेक नागरिकांनी हरहर व्यक्त करत आहेत. दरम्यान, गट विकास अधिकारी गणेश मोरे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकृती चांगली असून कोरोनाची लक्षणे जास्त दिसून येत नाहीत. संबंधित अधिकाऱ्यांच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींची माहिती जमा करण्याचे काम आरोग्य विभाग करत आहे.