पुण्यासाठी कोरोनाची  नवीन नियमावली ; येत्या सोमवारपासून होणार अंमलबजावणी

सर्वसामान्य नागरिकांना पहाटे ५ ते सकाळी ९ पर्यंत मॅार्निंग वॅाकसाठी सार्वजनिक ठिकाणे खुली राहणार आहेत. तर खासगी ॲाफिस हे ४ पर्यंत ५०टक्के क्षमतेने फक्त वर्किंग डे ला सुरु राहील. सार्वजनिक कार्यक्रमांना ५०टक्के क्षमतेने ४ वाजेपर्यंत परवानगी राहील. लग्नाला ५० लोक तर अंत्यविधीला २० लोकांना परवानगी असणार आहे.

    पुणे: महाराष्ट्रात कोरोनाचे निर्बंध शिथिल करत असताना पुणे शहरासाठी कोरोनाबाबतची नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे. या नियमानुसार पुण्यात दुपारी चारपर्यंत सर्व प्रकारची दुकाने सुरू राहणार आहेत. शहरातील हॉटेल ५० टक्के क्षमतेने सायंकाळी ४ पर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. मात्र मॉल आणि चित्रपटगृहे बंदच राहणार आहेत. सलून, स्पा आणि ब्यूटीपार्लरसह बंद असलेली खेळाची मैदाने आणि उद्यानांचे दरवाजे पुन्हा उघडणार आहेत. या शिवाय, बॅंका तसेच वित्तीय संस्थाचे कामकाज आठवडभर नियमित वेळेत सुरू असणार आहे शहरातील शाळा ३० जून पर्यंत बंदच असणार आहेत.


    सर्वसामान्य नागरिकांना पहाटे ५ ते सकाळी ९ पर्यंत मॅार्निंग वॅाकसाठी सार्वजनिक ठिकाणे खुली राहणार आहेत. तर खासगी ॲाफिस हे ४ पर्यंत ५०टक्के क्षमतेने फक्त वर्किंग डे ला सुरु राहील. सार्वजनिक कार्यक्रमांना ५०टक्के क्षमतेने ४ वाजेपर्यंत परवानगी राहील. लग्नाला ५० लोक तर अंत्यविधीला २० लोकांना परवानगी असणार आहे. तर महापालिकाच्या सर्वसाधारण सभा ५०टक्के क्षमतेने सुरु राहतील. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे आदेश काढले असून या नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे.

    हे आहेत नवीन नियम

    – हॉटेल, रेस्टोरंट ( सोमवार ते शुक्रवार ) दुपारी ४ पर्यंत ५० टक्के क्षमतेने

    -हॉटेल मधून शनिवार- रविवार केवळ पार्सल सेवा

    – लोकल – फक्त अत्यावश्‍यक सेवा कर्मचारी

    -सार्वजनिक ठिकाणे, मैदाने, चालणे – पहाटे ५ ते सकाळी ९ पर्यंत

    -खासगी कार्यालये ( सोमवार ते शनिवार ) – दुपारी ४ पर्यंत ( ५० टक्के कर्मचारी क्षमता)

    – क्रीडा – सकाळी ५ ते ९, सायंकाळी ६ ते ९ रिकाम्या जागा, मैदानात

    – चित्रीकरण – बायोबाल , सायंकाळी ५ पर्यंत

    – सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम -५० जणांच्या उपस्थितीत, सोमवार ते शुक्रवार दुपारी ४ पर्यंत

    – लग्न – ५० जणांच्या उपस्थितीत

    – अंत्यविधी – २० जणांच्या उपस्थितीत

    – शासकीय बैठका, सहकार बैठका – सभा – ५० टक्के उपस्थिती
    – बांधकाम – दुपारी ४ पर्यंत मुभा

    – शेती विषयक कामे – आठवड्याचे सर्व दिवस दुपारी ४ पर्यंत

    -शहरात सायंकाळी पाचनंतर संचारबंदी

    – जिम, सलून, ब्युटी पार्लर – ५० टक्के क्षमतेने , पूर्व नियोजित वेळ घेऊन

    – सार्वजनिक वाहतूक सेवा -५० टक्के क्षमतेने केवळ बसून

    – ई कॉमर्स – नियमित वेळेत

    – मला वाहतूक – नियमित वेळेत

    -अत्यावश्‍यक वस्तू उत्पादन कंपन्या, आयटी, डेटा सेंटर, – नियमित वेळेतसोमवारपासून पुणे शहरासाठी नवीन नियमावली