पुन्हा तीन बाधित सापडल्याने बाजारपेठेत खळबळ संगमनेर : दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर संगमनेरात पुन्हा तीन करोनाबाधित सापडले. त्यात एका व्यापार्‍याचा समावेश असल्याने बाजारपेठेत खळबळ उडाली

पुन्हा तीन बाधित सापडल्याने बाजारपेठेत खळबळ
संगमनेर :
 दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर संगमनेरात पुन्हा तीन करोनाबाधित सापडले. त्यात एका व्यापार्‍याचा समावेश असल्याने बाजारपेठेत खळबळ उडाली आहे. बुधवारी (दि. २४) सकाळी जिल्हा रुग्णालयाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार शहरात नव्याने तीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे रुग्ण संख्या ९७ वर पोहोचली असून, तालुक्यातील बाधितांचा आकडा शतकाजवळ पोहोचला आहे.
शहरातील उच्चभ्रू वसाहत समजल्या जाणार्‍या ऑरेंज कॉर्नर परिसरातही करोनाने शिरकाव केला असून, येथील एका ५५ वर्षीय इसमाला संक्रमण झाले आहे. त्याचबरोबर यापूर्वी बाधित आढळलेल्या शहराच्या मध्यभागातील नवघरगल्ली परिसरातील २६ वर्षीय तरुण व कोल्हेवाडी रोड भागातील ४० वर्षीय इसम संक्रमित झाल्याचे समोर आले आहे.
दोन दिवसांनंतर आज पुन्हा एकाचवेळी तीन रुग्णांची भर पडल्याने संगमनेर तालुक्यातील बाधितांचा आकडा आता शतकाजवळ जावून पोहोचला आहे. अर्थात यातील केवळ १६ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत.
आजच्या दिवसातील धक्कादायक गोष्ट म्हणजे शहरातील उच्चभ्रू वसाहतीचा परिसर म्हणून परिचित असलेल्या ऑरेंज कॉर्नर परिसरात पहिल्यांदाच करोना विषाणूंनी धडक दिली. गेल्या रविवारी (दि.२१) सकाळी संगमनेर शहरात सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली होती.
आता आज पुन्हा एकाचवेळी तिघांचे अहवालही पॉझिटिव्ह आल्याने संगमनेर तालुका हादरला आहे. तालुक्याच्या रुग्णसंख्येत आज तिघांची भर पडल्याने संगमनेर तालुक्यातील बाधितांची संख्या आता ९७ झाली आहे. सद्यस्थितीत यातील केवळ १६ रुग्ण उपचार घेत आहेत.