मलठणला कोरोनाचा संसर्ग वाढला, नागरिकांनी दक्षता घेण्याचे सरपंचांचे आवाहन

  • मलठण गावात कोरोना महामारीचा संसर्ग वाढलेला असल्याने उपविभागीय अधिकारी पुणे यांचे कडील आदेश क्रमांक कोरोना/कावी/८५०/२०२० दि.६८/२०२० च्या आदेशांन्वये मौजे मलठण हे संपुर्ण गाव दि.१९/८/२०२० पर्यंत पुर्णपणे बंद राहील याबाबत, मलठण ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने काल दि. ७ ला गावात दवंडी द्वारे नागरिकांना सूचित करण्यात आले आहे.

कवठे येमाई  – शिरूर तालुक्यातील मलठण येथे कोरोनाचा संर्ग वाढला असून कोरोना बाधितांची संख्या ४ झाली आहे. या पार्श्वभूमीवर गाव दि. १९ ऑगस्ट पर्यंत बंद करण्यात आले आहे. संसर्ग अधिक वाढू नये म्हणून प्रशासनाकडून देण्यात येणार-या सूचनांचे गावातील नागरिकांनी काटेकोरपाने पालन करावे, असे कळकळीचे आवाहन मलठणचे सरपंच प्रकाश गायकवाड यांनी केले आहे. 

मलठण गावात कोरोना महामारीचा संसर्ग वाढलेला असल्याने उपविभागीय अधिकारी पुणे यांचे कडील आदेश क्रमांक कोरोना/कावी/८५०/२०२० दि.६८/२०२० च्या आदेशांन्वये मौजे मलठण हे  संपुर्ण गाव दि.१९/८/२०२० पर्यंत पुर्णपणे बंद राहील याबाबत, मलठण ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने काल दि. ७ ला गावात दवंडी द्वारे नागरिकांना सूचित करण्यात आले आहे. 

मलठण येथील कोरोना बाधितांमध्ये १ महिला व ३ पुरुष असल्याचे सरपंच गायकवाड यांनी सांगितले. तर गाव बंदच्या कालावधीत कोणीही विनाकारण घराबाहेर फिरू नये, तसेच सक्तीने मास्कचा वापर करावा. सदर कालावधीत फक्त हॉस्पिटल व मेडिकल या अत्यावश्यकसेवाच चालू राहतील. सदरच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे अन्यथा आपत्ती व्यवस्थापन कायदा  २००५ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा ही प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.