जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीत भ्रष्टाचार ; मनसेचा आरोप

मनसेचा आरोप पुणे : महापािलकेने प्रतिबंधितीत क्षेत्रात वाटलेल्या जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीत लाखाे रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा अाराेप मनसेने केला अाहे. प्रत्येक िकटमध्ये साधारणपणे ९१ रुपये जास्तपुणे :
महापािलकेने प्रतिबंधितीत क्षेत्रात वाटलेल्या जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीत लाखाे रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा अाराेप मनसेने केला अाहे. प्रत्येक िकटमध्ये साधारणपणे ९१ रुपये जास्त खर्ची पडल्याचा दावाही मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला अाहे.काेराेनाचे हाॅटस्पाॅट ठरलेल्या भागांना महापािलकेने प्रतिबंधितीत क्षेत्र म्हणून जाहीर केले. या भागाला संपुर्णपणे सील केले हाेते. या भागातील नागरीकांना जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा भासू नये म्हणून  जीवनावश्यक वस्तंूचे किट वाटण्यात येत आहे. हे किट खरेदी करताना  लाखो रूपयांचा भ्रष्ट्राचार झाल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे़ सोमवारी मनसेच्या पदाधिकाºयांनी किट मधील वस्तूंच्या किंमती व बाजारातील किंमतीची याची तफावत महापालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून देत प्रत्येक किटमध्ये साधारणत: ९१ रूपये जास्त गेल्याचे सांगितले आहे़

जीवनावश्यक किटमधील १२ वस्तंूपैकी ६ वस्तू या बाजारामध्ये कमी किंमतीत उपलब्ध असताना, त्या चढ्या भावाने खरेदी करण्यात आल्याचा आरोप मनसेचे शहराध्यक्ष विशाल शिंदे, सचिव योगेश खैरे, संतोष पाटील आदींनी आयुक्तांची भेट घेऊन केला़ किटमधील आटा, तेल, पोहे, मीठ, साबण यांची जादा दराने खरेदी करण्यात आल्याचे सांगून, किटमध्ये नमूद केलेल्या साबन व तेल कंपन्या व प्रत्यक्षात दिलेल्या या वस्तंूच्या कंपन्या यामध्ये तफावत असल्याचे त्यांनी सांगितले़ किटमध्ये सनफ्लॉवर रिफार्इंड तेलाचा उल्लेख केला केला आहे़ पण प्रत्यक्षात स्वस्तातील सोयाबीन तेल दिले गेले आहे़ तसेच पोह्यांचा व मीठाचा भावही अनक्रमे चार व पाच रूपयांनी अधिकचा लावला गेला आहे़

पुणे महापालिकेच्यावतीने कंटन्मेंट झोनमध्ये ७० हजार किट वाटप करणार असल्याने कुठल्याही कंपनीने त्यांना या सर्व वस्तू पॅकिंग करून पालिकेकडे पोच केल्या असत्या़ असे असतानाही पालिकेच्या संबंधित अधिकाºयांनी कंपन्यांश्ी संपर्क न साधता, घाऊक बाजारातून त्याची खरेदी केली़ तसेच ट्रान्सपोर्ट, पॅकिंग व नफा याकरिता प्रत्येक किट मागे दहा रूपये जास्तीचे लावले व किटवर लावण्यात आलेला लोगो (पिशवीसह) दरही चार रूपयांनी अधिक दिला गेला आहे़ परिणामी प्रत्येक किट मागे साधारणत: ९१ रूपयांचा असा ६० ते ७० लाख रूपयांचा भ्रष्ट्राचार किट तयार करण्यामध्ये झाला असल्याचा आरोप मनसे पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांशी बोलताना केला़