अरे बापरे ! पुण्यातली हॉस्पिटल्स हाऊसफुल, वेटिंग रुममध्येच रुग्णांना लावावा लागतोय ऑक्सिजन

पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या इतक्या झपाट्याने वाढते आहे की पुण्यातील बेड्स आता कमी पडू लागले आहेत. पिंपरी-चिंचवड परिसरात तर आयसीयु बेड आणि व्हेंटिलेटरची संख्या रुग्णांच्या तुलनेत नगण्य असल्याचं लक्षात येऊ लागलं आहे. पिंपरी चिंचवडमधील यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटलमध्ये सध्या सर्व बेड फुल झाले असून गंभीर रुग्णांना वेटिंग एरियातच ऑक्सिजन लावून बसवून ठेवण्याची वेळ आलीय. 

    महाराष्ट्रात कोरोना उद्रेक कमी होण्याची चिन्हं दिसत नाहीएत. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांचे आकडे रोज नवनवे उच्चांक नोंदवत आहेत. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये कोरोनाने थैमान घातले असून पुण्यातील परिस्थिती सर्वात बिकट असल्याचं दिसून येत आहे.

    पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या इतक्या झपाट्याने वाढते आहे की पुण्यातील बेड्स आता कमी पडू लागले आहेत. पिंपरी-चिंचवड परिसरात तर आयसीयु बेड आणि व्हेंटिलेटरची संख्या रुग्णांच्या तुलनेत नगण्य असल्याचं लक्षात येऊ लागलं आहे. पिंपरी चिंचवडमधील यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटलमध्ये सध्या सर्व बेड फुल झाले असून गंभीर रुग्णांना वेटिंग एरियातच ऑक्सिजन लावून बसवून ठेवण्याची वेळ आलीय.

    पिंपरीमधील वायसीएम अर्थात यशवंतराव चव्हाण मेमोरिअल हॉस्पिटलमध्ये एकूण ४०० बेड आहेत. त्यापैकी ५५ बेड हे आयसीयु सुविधा असणारे आहेत. पुण्यात एकूण ७९ व्हेंटिलेटर आहेत. जे एकूण रुग्णसंख्येचा विचार करता नगण्य आहेत. गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात रुग्ण दाखल होत असून त्यात श्वास घ्यायला त्रास होणाऱ्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. अशा रुग्णांना तातडीने ऑक्सिजनचा पुरवठा करणे गरजेचे आहे. मात्र त्यांना बेडच उपलब्ध नसल्यामुळे वेटिंग रुममध्येच ऑक्सिजन लावण्याची वेळ आलीय.

    पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चाललीय. जिल्ह्यात सोमवारी आढळलेल्या रुग्णांची संख्या होती ८०७५. जिल्ह्यात सध्या ५ लाख ८० हजार जण कोरोनाबाधित असून पिंपरी चिंचवडमध्ये १ लाख ५३ हजार नागरिक कोरोनाबाधित आहेत.