कोरोनामुळे पालकांचे छत्र हरपलेल्या बालकांसाठी हेल्पलाइनची निर्मिती ; पिंपरी महानगरपालिकेचा उपक्रम

चाईल्ड हेल्पलाइन १०६८’ बाबतचे माहिती फलक रुग्णालयात दर्शनी भागात लावण्यात यावेत. शहरातील बालगृहे, निरीक्षणगृहातील बालकांकरीता तत्काळ उपचार पुरविण्यासाठी स्वतंत्र वैद्यकीय पथक नियुक्त करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या.

    पिंपरी: कोरोनामुळे पालक गमावलेल्या अनाथ बालकांची माहिती पिंपरी- चिंचवड महापालिकेकडून संकलित केली जात आहे. याबाबतची माहिती महापालिकेच्या सारथी हेल्पलाइनच्या ८८८८००६६६६ या क्रमांकावर किंवा महाराष्ट्र शासनाच्या चाईल्ड हेल्पलाइनच्या १०९८ या क्रमांकावर देऊन सहकार्य करावे, असे आवाहन महापौर उषा ढोरे यांनी केले आहे.

    कोरोनाने दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची तपशिलवार माहिती समन्वयक अधिकाऱ्यांस उपलब्ध करुन देण्यात यावी.रुग्णालयात दाखल होते वेळी या कालावधीमध्ये आपल्या बालकाचा ताबा कोणाकडे द्यावा, ती माहिती रुग्णालयाकडून भरुन घेण्यात यावी.’ चाईल्ड हेल्पलाइन १०६८’ बाबतचे माहिती फलक रुग्णालयात दर्शनी भागात लावण्यात यावेत.शहरातील बालगृहे, निरीक्षणगृहातील बालकांकरीता तत्काळ उपचार पुरविण्यासाठी स्वतंत्र वैद्यकीय पथक नियुक्त करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या.

    महापालिकेच्या टास्क फोर्सची नुकतीच बैठक झाली. बैठकीस प्रभारी अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर , उपायुक्त अजय चारठणकर आणि सहायक आयुक्त अण्णा बोदडे उपस्थित होते.या बैठकीय याबाबत चर्चा करण्यात आली.