सूस येथील ६० गुंठे जागा बळकावणाऱ्या एकावर गुन्हा

केदार  उर्फ  गणेश नानासाहेब गायकवाड (वय ३६, रा. एनएसजी हाऊस, औंध) असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे. विजय वसंत कुलकर्णी (वय ५८, रा. कर्वेनगर) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार २०१७ पासून घडला आहे. फिर्यादी कुलकर्णी यांच्या ट्रिनीटी रिअ‍ॅलीटी फर्मच्या मालकीची सूस येथे जागा आहे.

    पिंपरी :  जागा खरेदी-विक्री करणाऱ्या एका कंपनीच्या मालकीच्या ६० गुंठे जागेत बेकायदा पत्र्याचे आणि तारेचे कुंपण करून जागा बळकावणाऱ्या एकावर हिंजवडी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मुळशी तालुक्यातील सूस येथे घडला.

    केदार  उर्फ  गणेश नानासाहेब गायकवाड (वय ३६, रा. एनएसजी हाऊस, औंध) असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे. विजय वसंत कुलकर्णी (वय ५८, रा. कर्वेनगर) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार २०१७ पासून घडला आहे. फिर्यादी कुलकर्णी यांच्या ट्रिनीटी रिअ‍ॅलीटी फर्मच्या मालकीची सूस येथे जागा आहे. येथील ६० गुंठे जागेत आरोपी केदार याने बेकायदा घुसून पत्र्याचे आणि तारेचे कुंपण घातले आणि जागा बळकावण्याचा प्रयत्न केला. तसेच फिर्यादी कुलकर्णी यांना जागेत येण्यास मज्जाव केला. मोजणी नकाशामध्ये फेरफार करून कुलकर्णी यांच्या मालकीच्या जागेत तुटक रेषा मारली. तसेच बनावट नकाशा पोलीसांकडे जबाबासोबत सादर केला. सहायक पोलीस निरीक्षक खाडे तपास करत आहेत.