श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त  मिरवणुक काढणाऱ्या ब्राम्हण महासंघाच्या अध्यक्षावर गुन्हा

बुधवारी श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या ३२१ व्या जयंतीनिमित्त लाल महाल चौक ते शनिवारीवाडा दरम्यान वाजंत्री, घोडा यांच्यासह मिरवणुक काढण्यात आली होती.

    पुणे :  कोरोना नियमांचे उल्लघन करत श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या ३२१ व्या जयंती निमित्त मिरवणुक काढणाऱ्या ब्राम्हण महासंघाच्या अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांंवर पोलीसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अध्यक्ष आनंद दवे, मनोज तारे, श्रीपाद कुलकर्णी, मयुरेश घाणेकर, विनोद जोशी, मदन सिन्नरकर व इतर २० ते २५ जणांवर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस हवालदार गणेश तुर्के यांनी तक्रार दिली आहे.
    बुधवारी श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या ३२१ व्या जयंतीनिमित्त लाल महाल चौक ते शनिवारीवाडा दरम्यान वाजंत्री, घोडा यांच्यासह मिरवणुक काढण्यात आली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यामुळे शहरात निर्बंध आहेत. पण, कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याची कोणतीही खबरदारी न घेता लोकांचे जीवीतास धोका निर्माण होईल, असे कृत्य केल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.