बेदम मारहाणीत तरूणाच्या मृत्युप्रकरणी तिघांवर गुन्हा

आल्याने आसिफने त्याचा भाऊ नाझीम व मित्र बुऱ्हाण यांना बोलावून घेत फईम यांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर पुन्हा वाद मिटविण्यासाठी गणेशनगर येथे बोलावून घेत आसिफ व बुऱ्हाण यांनी त्यांना शिवीगाळ केली. तर, नाझीम याने फईम यांच्या छातीत जोरात ठोसा मारला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.

    पिंपरी: पैशांच्या वादातून तिघांनी तरुणाला केलेल्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना बोपखेल येथे घडली. फईम इक्राउद्दीन अन्सारी असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. आसिफ (वय २५, रा. कलवड, लोहगाव), नाझीम (वय २३), बुऱ्हाण (वय २५, दोघे रा. गणेशनगर, बोपखेल) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. सलिम इक्राउद्दीन अन्सारी (वय ३७, रा. ओटास्कीम, निगडी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी सलीम यांचा भाऊ फईम यांनी नाझीम यास दिलेले २० हजार रुपये नाझीमचा भाऊ आसिफ याला मागितले. याचा राग आल्याने आसिफने त्याचा भाऊ नाझीम व मित्र बुऱ्हाण यांना बोलावून घेत फईम यांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर पुन्हा वाद मिटविण्यासाठी गणेशनगर येथे बोलावून घेत आसिफ व बुऱ्हाण यांनी त्यांना शिवीगाळ केली. तर, नाझीम याने फईम यांच्या छातीत जोरात ठोसा मारला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. दिघी पोलिस तपास करत आहेत.