नियमांचे उल्लंघन केल्यामुळे वधूवरांसह पालकांवर गुन्हा

भोर : कोरोना आपत्ती व्यवस्थापन विवाह साजरा करणेबाबतच्या नियम व अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी तालुक्यातील नसरापूर येथील वधूवरांसह आयोजकांवर राजगड पोलिसांनी सोमवारी गुन्हा दाखल केला आहे.

 भोर : कोरोना आपत्ती व्यवस्थापन विवाह साजरा करणेबाबतच्या नियम व अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी तालुक्यातील नसरापूर येथील वधूवरांसह आयोजकांवर राजगड पोलिसांनी सोमवारी गुन्हा दाखल केला आहे. वैभव शिवाजी खुटवड,साहेबराव धर्माजी खुटवड,लताबाई शिवाजी खुटवड रा.उंबरे.तेजल आण्णा करंजकर, संपतराव गणपतराव तनपुरे,पांडूरंग संपतराव तनपुरे रा.नसरापूर अशी त्यांची नावे आहेत. या प्रकरणी ग्रामसेवक अभय किशोर निकम यांनी पोलीसांकडे फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार या विवाहासाठी सुमारे दीडशे नागरिकांनी सामाजिक अंतर न पाळता गर्दी केली होती.