वुमन्स हेल्पलाईनच्या प्रयत्नामुळे अल्पवयीन मुलीचा विवाह करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

जयसिंगपूर येथे एका अल्पवयीन मुलीचा विवाह झाला असल्याचे वुमन्स हेल्पलाईनच्या अध्यक्षा नीता परदेशी आणि सदस्यांना समजले. त्यानंतर त्यानी संबंधित कोल्हापूर पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक तसेच महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सवालाखे यांना देखील माहिती देण्यात आली.

    पिंपरी:पुणे जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीचा कोल्हापूर जिल्ह्यातील मुलासोबत विवाह लावण्यात आला. याबाबत वुमन्स हेल्पलाईनच्या प्रयत्नांमुळे विवाह लावणाऱ्यांवर आणि पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    जयसिंगपूर येथे एका अल्पवयीन मुलीचा विवाह झाला असल्याचे वुमन्स हेल्पलाईनच्या अध्यक्षा नीता परदेशी आणि सदस्यांना समजले. त्यानंतर त्यानी संबंधित कोल्हापूर पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक तसेच महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सवालाखे यांना देखील माहिती देण्यात आली. त्यांनी गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांना सांगून सूत्रे हलवली.

    सुरुवातीला वयाचा पुरावा न मिळाल्याने पोलिसांनी याबाबत टाळाटाळ केली कोणतेही स्टेटमेंट न घेता सगळ्यांना घरी पाठवून दिले खात्री करूनच एस पी ना माहिती दिली होती तरी ही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. मात्र, वुमन्स हेल्पलाईनच्या सदस्यांनी मुलीच्या वयाचे पुरावे गोळा करून पोलिसांसमोर सादर केले. त्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली.