पिंपरी चिंचवड महापालिका
पिंपरी चिंचवड महापालिका

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थापत्य, उद्यान, बीआरटीएस, ईडब्लूएस प्रकल्पातील 107 कामांमध्ये PSD (पर्फोर्मंस सेक्युरीटी डिपॉझिट) आणि FDR (फिक्स डिपॉझिट रिसीट) बोगस आढळून आले आहेत. त्यातील 18 ठेकेदारांवर फाैजदारी कारवाई करुन त्यांना ब्लॅकलिस्ट करण्यात येणार आहे, अशी माहिती स्थायी सभापती संतोष लांडे यांनी आज पत्रकारांना दिली.  महापालिकेच्या विविध कामांमध्ये ठेकेदारांनी PSD आणि FDR बोगस दिल्याची तक्रार आमदार लक्ष्मण जगताप आणि अण्णा बनसोडे यांनी केली होती. तसेच या प्रकरणाची चौकशी करून दोषी ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्या प्रकरणी आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी गंभीर दखल घेवून कारवाईचे आदेश दिले आहेत.

पिंपरी (Pimpari).  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थापत्य, उद्यान, बीआरटीएस, ईडब्लूएस प्रकल्पातील 107 कामांमध्ये PSD (पर्फोर्मंस सेक्युरीटी डिपॉझिट) आणि FDR (फिक्स डिपॉझिट रिसीट) बोगस आढळून आले आहेत. त्यातील 18 ठेकेदारांवर फाैजदारी कारवाई करुन त्यांना ब्लॅकलिस्ट करण्यात येणार आहे, अशी माहिती स्थायी सभापती संतोष लांडे यांनी आज पत्रकारांना दिली.  महापालिकेच्या विविध कामांमध्ये ठेकेदारांनी PSD आणि FDR बोगस दिल्याची तक्रार आमदार लक्ष्मण जगताप आणि अण्णा बनसोडे यांनी केली होती. तसेच या प्रकरणाची चौकशी करून दोषी ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्या प्रकरणी आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी गंभीर दखल घेवून कारवाईचे आदेश दिले आहेत.

महापालिकेच्या विविध विभागात विकास कामे ठेकेदार करीत असतात. ठेकेदारांच्या वाढलेल्या स्पर्धेमुळे कामाचा दर्जा व गुणवत्ता ढासळली आहे. त्यात सर्वात कमी दराने निविदा भरणा-या ठेकेदारांची संख्या वाढली आहे. महापालिकेच्या विविध कामे घेताना सन 2018-2019, 2019-2020, डिसेंबर 2020 आजअखेर या तीन वर्षातील त्या ठेकेदारांनी PSD (पर्फोर्मंस सेक्युरीटी डिपॉझिट) आणि महापालिकेला दिलेले FDR (फिक्स डिपॉझिट रिसीट) बोगस आढळून आले आहेत. महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी या प्रकरणी चाैकशीचे आदेश दिले. त्यानंतर महापालिकेच्या स्थापत्य, पाणीपुरवठा, विद्युत, जल:निस्सारण, आरोग्य, पर्यावरणासह अन्य विभागात FDR प्रकरणी सखोल चाैकशी झाली. ११ % पेक्षा कमी दराने निविदा भरणाऱ्या ठेकेदारांनी PSD (पर्फोर्मंस सेक्युरीटी डिपॉझिट) आणि मनपास दिलेले अनेक FDR (फिक्स डिपॉझिट रिसीट) खोटे निघाले. त्यामुळे प्रत्येक विभागाकडून बॅंकाकडे एफडीआरची खातरजमा करण्यात येत आहे.

महापालिकेच्या स्थापत्य, उद्यान, बीआरटीएस, ईडब्लूएस प्रकल्प या विभागातील झालेल्या चाैकशी आतापर्यंत बॅंक गॅरंटीचे 22 कोटीच्या 64 कामे (PSD-पर्फोर्मंस सेक्युरीटी डिपॉझिट) तर एफडीआरचे 2 कोटीचे 43 कामे (FDR -फिक्स डिपॉझिट रिसीट) अशा एकूण 107 कामांमध्ये 24 कोटी रुपयांचे बोगस एफडीआर आणि पीएसडी आढळून आले आहेत. त्या 18 ठेकेदारांवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान, महापालिकेच्या आरोग्य, विद्युत, पाणीपुरवठा, वैद्यकीय, आकाशचिन्ह परवाना, शिक्षण, मध्यवर्ती भांडार, वायसीएम भांडार, पर्यावरण, जलनि:स्सारण आदी विभागातील अधिका-यांनी ठेकेदारांच्या PSD (पर्फोर्मंस सेक्युरीटी डिपॉझिट) आणि मनपास दिलेले अनेक FDR (फिक्स डिपॉझिट रिसीट)ची माहिती दडविली आहे. या विभागातील वरिष्ठ अधिकारी ठेकेदारांचा बचाव करीत आहेत. त्यामुळे या प्रकरणी ठेकेदारांच्या कामांची सखोल चाैकशी करणे आवश्यक आहे. मात्र, मागील दहा वर्षापासून सर्व कामांची चाैकशी केल्यास शेकडो ठेकेदारांचे रॅकेट उघड होणार आहे. परंतू, महापालिका आयुक्तावरील राजकीय दबावामुळे हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होवू लागला आहे.