शिक्रापूरात तळीरामांची उडाली  झुंबड

मद्य खरेदीसाठी तळीरामांच्या लांबच लांब रांगा शिक्रापूर : देशभरात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे लॉकडाऊन झाल्यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांच्या रेशन, धान्य खरेदीसाठी तसेच जेवण आणि प्रवासाचे पास

मद्य खरेदीसाठी तळीरामांच्या लांबच लांब रांगा

शिक्रापूर : देशभरात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे लॉकडाऊन झाल्यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांच्या रेशन, धान्य खरेदीसाठी तसेच जेवण आणि प्रवासाचे पास मिळविण्यासाठी लांबचलांब रांगा लागल्याच्या दिसून येत होत्या मात्र मद्य विक्रीची दुकाने चालू करण्याचे आदेश प्राप्त होताच काही ठिकाणी मद्य खरेदीसाठी तळीरामांच्या लांबच लांब रांगा लागल्याच्या दिसून आल्या आहेत.

 राज्यभरासह पुणे जिल्ह्यामध्ये सर्वत्र मद्य विक्रीची दुकाने चालू करण्याबाबतचे आदेश प्राप्त होताच, शिक्रापूर ता. शिरूर येथे आज दुपारच्या मद्य विक्रीची दुकाने सुरु होताच तळीरामांची दिवाळी सुरु झाली, दुकाने सुरु होताच काही वेळामध्ये अचानक त्या ठिकाणी नागरिकांसह तळीरामांची गर्दी जमा झाली, यावेळी तळीरामांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या, एकाच वेळी शंभर ते दोनशे तळीरामांनी मद्य खरेदीसाठी गर्दी केली होती, तर गर्दी मध्ये नागरिकांनी अंतर देखील ठेवले नव्हते त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली होती, यावेळी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी गर्दी आटोक्यात आणण्यास सुरवात केली, तर शिक्रापूर येथील पाबळ चौक येथे तळीरामांची मोठी गर्दी झाल्याची माहिती मिळताच शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेंद्र शिंदे, पोलीस नाईक विलास आंबेकर यांनी त्या ठिकाणी जात गर्दी पांगवण्यासाठी प्रयतन करत नागरिकांना ठराविक अंतर ठेवण्याच्या सूचना दिल्या, तर यावेळी शिक्रापूर पाबळ चौक येथील सदर मद्य विक्री चालकास देखील सूचना दिल्या आहे.