भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांची अनेक ठिकाणी गर्दी

तळेगाव दाभाडे : कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी तळेगाव दाभाडे परिसरात तीन दिवसाच्या जनता कर्फूचा कालावधी पूर्ण होताच नागरिकांनी किराणा व भाजीपाला खरेदीसाठी अनेक ठिकाणी गर्दी केली होती.

 तळेगाव दाभाडे : कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी तळेगाव दाभाडे परिसरात तीन दिवसाच्या जनता कर्फूचा कालावधी पूर्ण होताच नागरिकांनी किराणा व भाजीपाला खरेदीसाठी अनेक ठिकाणी गर्दी केली होती. यावेळी बऱ्याच ठिकाणी नागरिकाकडून सुरक्षित अंतराचा नियम काळजीपूर्वक पाळला जात नसल्याचे दिसून येत होते.  

कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी तळेगाव दाभाडे नगर परिषद, शहर समन्वय समिती, किराणा असोशिएशन आणि भाजीपाला व्यापारी यांच्या सहमतीने जनता कर्फूच्या कालावधी दि. १६, १७ व १८ एप्रिल रोजी (गुरुवार ते शनिवार) असा होता. या काळात सकाळी दुग्ध व्यावसयिक तसेच काही दवाखाने व सर्व मेडिकलची दुकाने चालू ठेवण्यात आली होती. बाकी सर्व व्यवहार पूर्णपणे बंद होते. जनता कर्फूचा तीन दिवसाचा कालावधी संपल्या नंतर नागरिक प्रशासनाने दिलेल्या वेळेमध्ये भाजीपाला, किराणा आदि खरेदीसाठी बाहेर पडले. खरेदी करताना जास्तीत जास्त सुरक्षित अंतर कसे राहील याची काळजी घेतली जात होती.परंतु काही ठिकाणी भाजीपाला खरेदी करताना नियमाचे उल्लघन  केले जात होते. नियमाचे उल्लघन कारणा-या बेजबाबदार नागरिकास पोलीस खात्याकडून सक्त ताकीद दिली जात होती.