कमिन्स’ कंपनी कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ ; पालिकेकडून ३ दिवस कामकाज बंद ठेवण्याचे आदेश , ५० कामगार कोरोनाबाधित

कंपनीत जेवणाची व्यवस्था एकाच ठिकाणी असल्याने तेथे कामगार एकत्र येत आहेत. तेथे काेराेनाचा संसर्ग अधिक हाेण्याचा धाेका आहे. कंपनीच्या एकूण कामगारांच्या संख्येत २० टक्के कामगार हे काेराेनाबाधित झाले आहेत. त्यामुळे कंपनीचे क्षेत्र हे काेराेनाचे ‘हाॅटस्पाॅट’ म्हणून महापालिकेनेजाहीर केले आहे.

    पुणे : काेथरुड – डहाणुकर काॅलनी येथील ‘कमिन्स’ कंपनी काेराेनाचा ‘हाॅटस्पाॅट’ ठरली आहे. सध्या कंपनीतील ५० कामगार हे काेराेनाचे सक्रीय रुग्ण असल्याचे आढळून आले आहे. यामुळे महापािलकेने २३ मेपर्यंत कंपनी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. काेराेना प्रतिबंधात्मक उपाय याेजना करूनच कंपनी सुरु करावे असेही त्यात नमूद केले आहे.

    महापालिकेच्या  प्रशासानेन काेराेना नियंत्रणासाठी जारी केलेल्या निर्देशांचे याेग्य आणि परिपूर्णपणे पालन हाेत नसल्याने कामगारांमध्ये काेराेनाचा संसर्ग पसरल्याचे महापािलकेने कंपनीला दिलेल्या आदेशात म्हटले आहे. महापािलकेच्या अधिकाऱ्यांनी कंपनीची पाहणी करून अहवाल सादर केला हाेता. या अहवालानुसार गेल्या दाेन महीन्यात कंपनीतील २४० कामगारांना काेराेनाची लागण झाली. त्यापैकी तीन कामगारांचा काेराेनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच सध्या कंपनीतील एकूण ५० कामगार कोरोनाचे सक्रीय रुग्ण असल्याचे

    अहवालात नमूद केले आहे. या कंपनीत जेवणाची व्यवस्था एकाच ठिकाणी असल्याने तेथे कामगार एकत्र येत आहेत. तेथे काेराेनाचा संसर्ग अधिक हाेण्याचा धाेका आहे. कंपनीच्या एकूण कामगारांच्या संख्येत २० टक्के कामगार हे काेराेनाबाधित झाले आहेत. त्यामुळे कंपनीचे क्षेत्र हे काेराेनाचे ‘हाॅटस्पाॅट’ म्हणून महापालिकेनेजाहीर केले आहे.

    याबाबत महापालिकेने कंपनीच्या व्यवस्थापनाला कळविले असून, २० ते २३ मे याकालावधीत कंपनीचे कामकाज बंद ठेवण्यात यावे. सर्व कामगारांचे रॅपीड अॅन्टीजन किंवा आरटीपीसीआर कोविड चाचणी क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी डॉ.अंजली टिळेकर यांच्या नियंत्रणाखाली करावी. त्याचा अहवाल २२ मेपर्यंत सादर करावा. सर्व कामगारांचे पुढील आदेशापर्यंत १० दिवसांमध्ये कोबिड बाबत फेर चाचणी करण्यात यावी.

    सर्व कामगारांना फेसशिल्ड मास्क उपलब्ध करून देण्यात यावे. कंपनीतील कॅन्टीन मध्ये कामगारांना बसुन खाण्याकरीता प्रतिबंध करण्यात आला आहे. कामगारांचे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे, कंपनीचा परीसर आणि यंत्र सामुग्री निर्जुंकीकरण करून घ्यावी असेही महापालिकेने कंपनीला आदेश दिले आहेत.