विजबिल भरून ग्राहकांनी महावितरणला सहाकार्य करावे; अधिक्षक अभियंता राजेंद्र पवार यांचे आवाहन

भिमाशंकर : लॉकडाऊन कालावधीत वीज ग्राहकांकडील मीटर रिडिंग घेता आले नाही. त्यामुळे एप्रिल व मे महिन्यात सरासरी विजवापरानुसार बिल देण्यात आले. सध्या मीटर रिडींग घेऊन जूनचे बिल देण्यात

 भिमाशंकर :   लॉकडाऊन कालावधीत वीज ग्राहकांकडील मीटर रिडिंग घेता आले नाही. त्यामुळे एप्रिल व मे महिन्यात सरासरी विजवापरानुसार बिल देण्यात आले. सध्या मीटर रिडींग घेऊन जूनचे बिल देण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांनी विजबिल भरून महावितरणला सहाकार्य करावे, असे आवाहन अधिक्षक अभियंता राजेंद्र पवार, कार्यकारी अभियंता हेमचंद्र नारखेडे यांनी केले आहे.        

आपल्या विज वापराची पडताळणी ग्राहकांनी केली तर त्यांना आपले विजबिल योग्य व अचूक असल्याचे लक्षात येईल. अनेक ग्राहकांनी स्वतःचे विजबिल तपासून न बघता केवळ विजबिलांची रक्कम जास्त दिसते म्हणून आलेले बिल चुकीचे आहे, असा समज करून घेत आहेत. मागील वर्षाच्या उन्हाळयाचा विजवापर आणि चालू वर्षातील लॉकडॉऊनमध्ये २४ तास घरात राहून केलेला विजवापर यांची तुलना केली तर असे दिसून येईल की, या वर्षातील एप्रिल, मे व जून महिन्यांतील विजवापर हा मागील वर्षाच्या विजवापराच्या तुलनेत बरोबर आहे.  
महावितरण विजबिलात कुठलीही आकारणी छुप्प्या स्वरूपात करीत नाही किंवा आकारणी करताना मनमानी करीत नाही. विज नियामक आयोगाने ठरवून दिलेल्या दरानुसारच ग्राहकांना विजबिल आकारले जाते, असा दावा महावितरणने केला आहे. ग्राहकांच्या विजबिलांवर सर्व माहिती छापील स्वरूपात दिलेली आहे. आता लॉकडाऊनच्या शिथीलतेमुळे या जून महिन्यात प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर सर्व ठिकाणी मीटरची रिडींग घेऊन बिल देण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे बिल जास्त आले असल्याच्या तक्रारीचे प्रमाण वाढु शकते. ऊर्जा मंत्री यांच्या सुचनेनुसार संबंधित ग्राहकांना हफ्ते करून लागल्यास वीज कार्यालयातील अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे, उपकार्यकारी अभियंता एन. एन. घातुळे, जयंत गेटमे यांनी सांगितले.