मोबाईल आणि इमेल हॅक करत सायबर चोरट्यांनी लांबविले सव्वा तीन लाख रुपये

तक्रारदार हे आंबेगाव पठार परिसरात राहतात. ते उच्च शिक्षीत आहेत. त्यांच्याकडे दोन बँकांचे क्रेडिट कार्ड आहेत. त्यांनी दोन्ही क्रेडिट कार्डची डिटेल्स क्रेड अॅपमध्ये भरलेली असून, त्याद्वारे ते व्यावहार करतात. दरम्यान, त्यांनी घटनेदिवशी क्रेड अॅपवरून ८९ हजार ९४९ रुपये बचत खात्यात भरले. पण त्याबाबतचा एसएमएस त्यांना आला नाही. त्यामुळे त्यांनी क्रेड अॅटचा ग्राहक क्रमांक शोधला.

    पुणे : मोबाईल आणि इमेल हॅककरून सायबर चोरट्यांनी एकाच्या खात्यावरून सव्वा तीन लाख रुपयांचा ऐवज ट्रान्सफरकरून फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. काही तासांत सायबर चोरट्यांनी ही कामगिरी केली असून, ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधल्यानंतर सायबर चोरट्याने ही फसवणूक केली आहे.

    याप्रकरणी ३२ वर्षीय व्यक्तीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, गुजरात, आंध्रप्रदेश व वेस्ट बंगाल येथील तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २३ जुलै रोजी घडला आहे.

    पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे आंबेगाव पठार परिसरात राहतात. ते उच्च शिक्षीत आहेत. त्यांच्याकडे दोन बँकांचे क्रेडिट कार्ड आहेत. त्यांनी दोन्ही क्रेडिट कार्डची डिटेल्स क्रेड अॅपमध्ये भरलेली असून, त्याद्वारे ते व्यावहार करतात. दरम्यान, त्यांनी घटनेदिवशी क्रेड अॅपवरून ८९ हजार ९४९ रुपये बचत खात्यात भरले. पण त्याबाबतचा एसएमएस त्यांना आला नाही. त्यामुळे त्यांनी क्रेड अॅटचा ग्राहक क्रमांक शोधला. त्या क्रमांकावरून संपर्क साधून विचारपूस केली. त्यावेळी मोनाफल्ली शेख नावाचा व्यक्ती त्यांच्याशी बोलला. त्याने क्रेड अॅपवर इमेल आयडी, दोन्ही क्रेडिट कार्डवरील क्रमांक तसेच गुगल सिक्युरिटी कोड अशी संपुर्ण माहिती भरण्यास सांगितली. त्यांनी ती भरली. क्रेड अॅपवर माहिती भरून अॅड्रेस मेन्युमध्ये टाईपकरून भरताच त्याने तक्रारदार यांचा मोबाईल व इमेल हॅक केला. तसेच, त्याद्वारे त्यांच्या दोन्ही खात्यातून एकूण ३ लाख १९ ८०६ रुपये रक्कम ट्रान्सफरकरून त्यांची फसवणूक केली आहे. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी सायबर सेलकडे तक्रार केली होती. त्याची प्राथमिक चौकशी झाल्यानंतर पोलीसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.