चक्रीवादळामुळे आंबेगाव तालुक्यातील ३४ जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचे नुकसान

मंचर : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात झालेल्या चक्रिवादळामुळे शाळांच्या छतांचे पत्रे,किचनशेडचे पत्रे उडाले.तसेच इमारतीला तडे जाणे,खिडकी,दरवाजे,स्वच्छतागृह,पाण्याची टाकी,संरक्षक

मंचर : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात झालेल्या चक्रिवादळामुळे शाळांच्या छतांचे पत्रे,किचनशेडचे पत्रे उडाले.तसेच इमारतीला तडे जाणे,खिडकी,दरवाजे,स्वच्छतागृह,पाण्याची टाकी,संरक्षक भिंत,शाळेतील शैक्षणिक साहित्य आदी बाबींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.सुमारे ३४ शाळांचे १ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे.

तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शाळा कुंभेवाडी,जांभोरी,फलोदे,हरणमाळ,न्हावेड,पांचाळे खुर्द,जांभळेवाडी,मापोली,म्हतारबाचीवाडी,काळवाडी,बेंढारवाडी,दरेवाडी,उंबरवाडी आदी शाळांचा यात समावेश आहे.चक्रीवादळाने शाळांचे छप्पर उडाले असून यावेळी कपाटात असलेली महत्वाची कागदपत्रेही भिजली असल्याने खराब झाली आहेत.यातील काही इमारती धोकादायक झालेल्या आहेत.त्यामुळे शाळा चालू झाल्यावर विद्यार्थी बसणार कुठे?असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.  जिल्हा परिषद व तालुका पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्याकडून पावसाने झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्यात येत आहे.पण निधी उपलब्ध होणार कधी व दुरुस्ती कधी करायची.असा प्रश्न शालेय व्यवस्थापन समितीला पडला आहे.कोरोनाबाधित  तालुक्यात ४३ रुग्ण असले तरी सोमवार दि.१५ जूनला शाळा सुरु करण्याचे शिक्षण विभागाचे नियोजन सुरु आहे.तालुक्यातील पूर्व भागातील बहुतांश शाळा इमारती या स्लॅबच्या आहेत.पण पश्चिम भागात मात्र याउलट परिस्थिती पाहायला मिळत आहे.जुन्या पत्र्याच्या इमारती   दुरावस्थेमुळे धोकादायक बनल्या आहेत.गेले अनेक वर्षापासून आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवीन इमारतीच्या प्रतीक्षेत आहेत.जुन्या जीर्ण झालेल्या इमारती यामुळे पाऊस पडला की वर्गात पाणी शिरते.छतावरुन वर्गात पाणी गळू लागते.शाळेतील भिंती जीर्ण झाल्याने शाळेतील विद्याथ्र्याच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.याकडे शिक्षण विभागाने तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे.असे नागरिकांचे म्हणणे आहे.या शाळांची दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे देण्यात आलेले आहे.मात्र  मागील अनेक वर्षभरापासून त्याला मंजुरी मिळालेली नाही.यात उखडलेले प्लास्टर,तुटलेली दारे,गळके वर्ग, फुटक्या फरशा यामुळे विद्याथ्र्याना शिक्षण घेताना त्रास सहन करावा लागत आहे.यात आदिवासी भागात बè्याच शाळांना संरक्षक भिंत नाही.पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही.शौचालय उपलब्ध नाही,लाईट नाही इत्यादी गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.शाळा व्यवस्थापन समितीने अनेकदा मागणी केल्यावरही नवीन इमारती व बाकीच्या बाबी या भागात मिळालेल्या नाहीत.जिल्हा परिषदेकडे समग्र शिक्षा अभियान मोहिमेअंतर्गत कोट्यवधी  रुपये पडून आहेत.परंतु थातूर-मातूर दुरुस्ती केली जाते.वरीष्ठ अधिकाè्यांच्या दुर्लक्षामुळे नवीन इमारत बांधकाम प्रस्ताव तसेच धूळखात पडून आहे.पावसाळ्यात वर्गात बसणे त्रासदायक असल्याने विद्याथ्र्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.त्यामुळे पावसामुळे एखादी इमारत कोसळून दुर्घटना घडली तर त्याला कोण जबाबदार राहणार,असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे.