दाभोळकर हत्या प्रकरण: पाचही आरोपींवर ‘यूएपीए’ लागू करा;सीबीआयची न्यायालयाकडे मागणी

दाभोलकर हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सदस्य होते. त्यांच्या गटामध्ये भीती निर्माण करण्याचा आरोपींनी प्रयत्न केला. यूएपीएमधील कलम 16 नुसार गुन्हा लागू करण्याची राज्य सरकारने परवानगी दिल्याचे वकिलाने सांगितले. आरोपींच्यावतीने अॅड. विरेंद्र इचलकंरजीकर यांनी हा कायदा लागू करण्याला विरोध केला. सारंग अकोलकर आणि विनय पवार यांनी दाभोळकर यांची हत्या केल्याचा दावा सीबीआयने सुरुवातीला केला. त्यामध्ये तावडे यांनी कट रचल्याचे सीबीआयने म्हटले होते.

    पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणातील पाचही आरोपींवर बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) अधिनियम अर्थात यूएपीए अंतर्गत कारवाई केली जावी, अशी मागणी सरकारी वकिलाने सीबीआयच्या विशेष न्यायालयात केली. पाचही आरोपींनी लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे सीबीआयने म्हटले आहे.

    डॉ. दाभोळकर यांच्या हत्याप्रकरणात डॉ. विरेंद्रसिंह तावडे, शरद कळसकर, सचिन अंदूरे, अॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे हे आरोपी असून त्यांना अतिरिक्त सत्र न्यायालात हजर करण्यात आले. सरकारी वकील प्रकाश सुर्यवंशी यांनी सीबीआयतर्फे न्यायालयात म्हणणे मांडले.

    दाभोलकर हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सदस्य होते. त्यांच्या गटामध्ये भीती निर्माण करण्याचा आरोपींनी प्रयत्न केला. यूएपीएमधील कलम 16 नुसार गुन्हा लागू करण्याची राज्य सरकारने परवानगी दिल्याचे वकिलाने सांगितले. आरोपींच्यावतीने अॅड. विरेंद्र इचलकंरजीकर यांनी हा कायदा लागू करण्याला विरोध केला. सारंग अकोलकर आणि विनय पवार यांनी दाभोळकर यांची हत्या केल्याचा दावा सीबीआयने सुरुवातीला केला. त्यामध्ये तावडे यांनी कट रचल्याचे सीबीआयने म्हटले होते.

    मात्र, त्यानंतर अंदूरे आणि कळसकर यांनी दाभोलकर यांची हत्या केल्याचा दावा करण्यात आला. त्यामध्ये तावडे याने कट रचल्याचे म्हटले आहे. हे दोन्ही खरे असू शकते का? एकच घटना असू शकते, असा प्रश्न बचाव पक्षाने उपस्थित केला. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने पुढील सुनावणी 7 सप्टेंबरला घेण्याचे जाहीर केले.

    read_also content=”मुंबईतील कोरोना घालविण्यासाठी BMC चा जबरदस्त प्लान; नागरिकांचा बॉडी मास इंडेक्स तपासला जाणार~https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/corporation-to-conduct-survey-of-non-communicable-diseases-in-mumbai-citizens-body-mass-index-will-be-checked-nrvk-171732/”]