बापरे ! पिंपरी चिंचवड़ फर्नीचरच्या दुकानात घुसली भरधाव कार; नशीब बलवत्तर म्हणून जीवितहानी टळली

अचानक पुढून रिक्षा आल्याने भरधाव मोटारीवरील चालकाचा ताबा सुटून मोटार थेट फर्निचरच्या दुकानात शिरली. भरधाव मोटार दुकानात शिरून झालेल्या अपघातात मोटारीतील तीन अल्पवयीन मुले किरकोळ जखमी झाले आहेत. इतर तीन दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे.

पिंपरी: भरधाव कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने कार रस्त्या लगत असलेल्या दुकानात शिरल्याची घटना घडली पिंपरी चिंचवड़ मधील पुनावळे येथे घडली आहे. केवळ नशीब बलवत्तर असल्याने या घटनेत कोणतीही जीविहितहानी झालेली नाही. मात्र, मोटारीमधील तीन अल्पवयीन मुलांना किरकोळ जखम झाली असल्याची माहिती हिंजवड़ी पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी पावणे पाचच्या सुमारास पुनावळे येथे घडली आहे. अचानक पुढून रिक्षा आल्याने भरधाव मोटारीवरील चालकाचा ताबा सुटून मोटार थेट फर्निचरच्या दुकानात शिरली. भरधाव मोटार दुकानात शिरून झालेल्या अपघातात मोटारीतील तीन अल्पवयीन मुले किरकोळ जखमी झाले आहेत. इतर तीन दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे. नशीब बलवत्तर असल्याने मोठी जीविहितहानी झालेली नाही.

या अपघातात फर्नीचरच्या दुकानाचे मोठे नुकसान झाले असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांनी दिली आहे. अद्याप मोटार चालकासह तिघांची नावे समजू शकली नाहीत. त्यांच्याकडे वाहन परवाना नसल्याचं देखील सांगितले जातं आहे. अपघात झाल्यानंतर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. घटनेचा अधिक तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.