शिक्रापुरात शॉटसर्किटने डेअरी जळून खाक

शिक्रापूर : सलग दोन दिवस झालेल्या पावसानंतर आज पहाटेच्या सुमारास एका दुध डेअरीला आग लागून डेअरीतील महागडे फ्रीज व आदी साहित्य जाळून खाक होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याची घटना घडली आहे.

 शिक्रापूर : सलग दोन दिवस झालेल्या पावसानंतर आज पहाटेच्या सुमारास एका दुध डेअरीला आग लागून डेअरीतील महागडे फ्रीज व आदी साहित्य जाळून खाक होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याची घटना घडली आहे.

 
                           शिक्रापूर (ता. शिरूर)  येथील तळेगाव रोड लगत पाण्याच्या टाकी शेजारी तुषार हरगुडे यांची तुषार दुध डेअरी नावाने डेअरी आहे.  रात्रीच्या वेळी डेअरीचालक डेअरी बंद करून घरी गेले होते. पहाटेच्या सुमारास सदर डेअरीतून धूर बाहेर येत असल्याचे काही नागरिकांना दिसले. त्यांनतर त्यांनी सदर डेअरी मालक तुषार हरगुडे यांना फोन करून माहिती दिली त्यानंतर हरगुडे यांनी सदर  ठिकाणी येऊन पाहणी केली असता त्यांना दुकानातून मोठ्या प्रमाणत धूर बाहेर येत असल्याचे दिसून आले. तेव्हा काही नागरिकांच्या मदतीने दुकानाचे शटर उघडले आतमध्ये असलेले सर्व फ्रीज व आदी साहित्य जाळून खाक झाल्याचे निदर्शनास आले.त्याचबरोबर डेअरी मधील पाच लहान मोठे फ्रीज, त्यासह डेअरीमध्ये असलेले खाद्य पदार्थ आणि इतर साहित्य जाळून खाक झाले. या आगीमध्ये अंदाजे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले असून डेअरीला लागलेली आग शॉटसर्किटमुळे लागली असल्याचा अंदाज नागरिकांनी व्यक्त केला आहे.  यावेळी आग लागलेल्या डेअरी शेजारी टायर व वह्या पुस्तकांचे दुकान असून शेजारील दुकान सुदैवाने बचावले आहे. घटनेची माहिती मिळाल्या नंतर विद्युत वितरण विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता याबाबत बोलताना सदर आग लागलेल्या ठिकाणी जाऊन आम्ही पाहणी केली असून विद्युत निरीक्षक कार्यालय पुणे येथे याबाबत रिपोर्ट पाठविण्यात आले आहे. तेथील अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल असे विद्युत वितरण विभागाचे उपकार्यकारी अभियंता नितीन महाजन यांनी सांगितले.