गॅस,पेट्रोल,डिझेल महागाई व वीजबिल सक्तीची वसुली विरोधात दलित पँथर्सचे निदर्शने

एकिकडे कोरोना महामारी व लॉकडाऊन मुळे मजुरी व व्यावसाय मंदावले तर दुसरीकडे महागाई उच्चांक गाढत आहे. या सर्व परिस्थितीला सर्वसामान्य जनता त्रस्त होत आहे. पेट्रोल, डिझेल ने शतक पुर्ण केले तर राज्यातील वीज ग्राहकांकडून सक्तीची बील वसूली करून जनतेवर अत्याचार करत आहेत. लवकरात लवकर नागरिकांवर होत असलेल्या अत्याचाराला आळा घालावा.

    पुणे: दलित पँथर्स ऑफ इंडिया (महाराष्ट्र प्रदेश) यांच्या वतीने सोमवार गॅस,पेट्रोल,डिझेल महागाई व वीजबिल सक्तीची वसुली विरोधात पुणे जिल्ह्याधिकारी कार्यालया समोर ‘जन आंदोलन’ करण्यात आले. पुणे जिल्ह्याधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या कडे सदर विषयाचे निवेदन देऊन कार्यालया समोर निदर्शने करण्यात आली.
    एकिकडे कोरोना महामारी व लॉकडाऊन मुळे मजुरी व व्यावसाय मंदावले तर दुसरीकडे महागाई उच्चांक गाढत आहे. या सर्व परिस्थितीला सर्वसामान्य जनता त्रस्त होत आहे. पेट्रोल, डिझेल ने शतक पुर्ण केले तर राज्यातील वीज ग्राहकांकडून सक्तीची बील वसूली करून जनतेवर अत्याचार करत आहेत. लवकरात लवकर नागरिकांवर होत असलेल्या अत्याचाराला आळा घालावा व या बाबींचा फसवा कारभार महाराष्ट्र शासनाने थांबवावा अन्यथा हे आंदोलन भविष्यात आक्रमक रूप घेईल असा इशारा इलियास शेख यांनी या वेळी दिला.

    यावेळी दलित पँथर्स ऑफ इंडियाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष बापूसाहेब भोसले यांच्या नेतृत्वाखाली व महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष ईलीयास भाई शेख यांच्या आयोजनातून करण्यात आलेल्या या जन आंदोलन प्रसंगी पुणे शहर अध्यक्ष महादेव गायकवाड, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विजय भालेराव, जिल्हा अध्यक्ष संघराज गायकवाड, पुणे महिला आघाडी अध्यक्षा द्रौपदी पाटील, पिंपरी चिंचवड महिला अध्यक्षा गंगा सेन, रफिक इमानदार, पिंकू झेंडे, मेहबूब मणियार, जावेद शेख, अनेक पँथर्स उपस्थित होते.