लॉकडाऊननंतर न्यायालयात गर्दीला आवरताना दमछाक

पक्षकारांची गर्दी होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन, वकील संघटना यांना काळजी घ्यावी लागणार पुणे : एरवी केवळ सुट्टीच्या दिवशी बंद असणारे न्यायालय तब्बल अडीच महिन्यानंतर सुरु झाले. यावेळी न्यायालयात

पक्षकारांची गर्दी होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन, वकील संघटना यांना काळजी घ्यावी लागणार

पुणे :
एरवी केवळ सुट्टीच्या दिवशी बंद असणारे न्यायालय तब्बल अडीच महिन्यानंतर सुरु झाले. यावेळी न्यायालयात पक्षकारांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. ही गर्दी हटवण्यासाठी वकिलांना पुढाकार घ्यावा लागला. त्यांनी केलेल्या आवाहनला प्रतिसाद देऊन न्यायालयाच्या पहिल्या दिवसाचे कामकाज पार पडले. बार असोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांना पक्षकारांना समजुन सांगताना नाकीनऊ आल्याचे दिसून आले. सध्या दोन शिफ्ट मध्ये न्यायालयाचे कामकाज सुरु करण्यात आले आहे. यापुढील दिवसांत पक्षकारांनी गर्दी होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन, वकील संघटना यांना काळजी घ्यावी लागणार आहे.       सातत्याने नागरिकांना आवाहन करुन देखील ते ऐकत नाही म्हटल्यावर अखेर काम असल्याशिवाय न्यायालयात प्रवेश दिला जाणार नाही त्यामुळे गर्दी करू नका असे  पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यानंतर काही प्रमाणात गर्दी कमी झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे २३ मार्च पासून न्यायालयाचे कामकाज बंद होते. लॉकडाउनच्या काळात न्यायालयात सकाळी ११ ते दुपारी २ यावेळेत फक्त महत्वाच्या प्रकरणांवर सुनावणी सुरू आहे. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने ८ जून पासून योग्य त्या उपाययोजना करून सकाळी १० ते १ आणि दुपारी २.३० ते सायंकाळी ५.३० अश्या दोन शिफ्टमध्ये राज्यातील न्यायालयाचे कामकाज सुरू करण्या बाबत निर्देश दिले.       यामध्ये प्रामुख्याने न्यायालयात प्रवेश करण्यासाठी फक्त एकच प्रवेशद्वार असावे, कामकाज असल्याशिवाय वकील, पक्षकारांना न्यायालयात प्रवेश देऊ नये, न्यायालयात प्रवेश देताना प्रवेशद्वारावर हॅण्ड सॅनिटाइज करण्यासाठी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, प्रवेश देताना प्रत्येकाचे थर्मल स्कॅनिंग करावे, काम झाले की तात्काळ न्यायालयाच्या बाहेर निघून यावे आदी सूचना करण्यात आल्या होत्या. यावेळी पक्षकाराना न्यायालयात प्रवेश देण्यात येणार नसल्याने गर्दी न करण्याचे आवाहन वेळोवेळी प्रशासनामार्फत करण्यात आले होते. असे असताना असे असताना देखील वकील आणि पक्षकारांनी न्यायालयात गर्दी केली होती. मात्र बार असोसिएशनचे पदाधिकारी आणि  पोलीस कर्मचारी यांनी आव्हान केल्यावर काही काळानंतर गर्दी आटोक्यात आली"लॉकडाउन नंतर कामकाजाचा पहिला दिवस असल्याने न्यायालयात सोमवारी गर्दी झाल्याचे दिसून आले. मात्र न्यायालयामार्फत उद्या आणि परवाच्या कामाची माहिती फलकाव्दारे प्रसिध्द करण्यात येणार आहे. ती माहिती वकिलांच्या व्हाटस अ‍ॅपवर पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे ज्याच्या खटल्याची तारीख आहे त्यानेच न्यायालयात यावे. विनाकारण गर्दी करू नये. कोरोनाचे सावट अजून दूर झालेले नाही. त्यामुळे वकील, पक्षकारांनी विनाकारण न्यायालयात गर्दी करू नये.  गर्दी वाढल्यास आणि त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यास पुन्हा न्यायालय बंद करण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे वकील आणि पक्षकारांनी प्रशासनला सहकार्य करावे."

  – अ‍ॅड. सतीश मुळीक (अध्यक्ष, पुणे बार असोसिएशन)",