आंबेगाव तालुक्यात कोरोनाचा धोका कायम ; एकूण रुग्णसंख्या ४३

                                                                                                                                                                                                    

भिमाशंकर :  आंबेगाव तालुक्यात कोरोना बाधित व्यक्तिंची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असुन त्यात अजुन भर पडली आहे. यामध्ये दि.५ रोजी गिरवली येथे तीन व्यक्तिंचा अहवाल पॉझिटीव्ह आला असल्याने एकुण रूग्ण संख्या ४३ झाली असल्याचे गटविकास अधिकारी जालींदर पठारे यांनी सांगितले.  

ग्रामीण भागात वाढणारा कोरोना संसर्ग वाढत जात असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. त्यांच्यावर भीमाशंकर हॉस्पिटल मंचर व पुणे येथील रूग्णालयांत उपचार सुरू आहेत. या रूग्णांच्या संपर्कातील व्यक्तिंचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्यात येणार आहे. गिरवली येथील तीन व्यक्ति विस ते पन्नास वयोगटातील असुन यामध्ये एक पुरूष व दोन महिला आहे. या व्यक्ति गावी मुंबईहून आलेल्या आहेत. त्यामुळे कोरोना बाधित व्यक्तिंची संख्या ४३ झाली आहे. यामध्ये गिरवली गावातील सहा कोरोना बाधित व्यक्ति आहे. तर तालुक्यातील कोरोना बाधित व्यक्तिंमधील सहा व्यक्तिंना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये जवळे, साकोरे, गिरवली प्रत्येकी एक व शिनोली तीन या गावातली व्यक्तिंना घरी सोडले आहे. तर तालुक्यातील १६ गावे प्रतिबंधक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेली आहे.       

मुंबई, पुणे व इतर शहरांमधून आलेल्या व येणा-या नागरिकांनी काळजी घेत स्वतः क्वॉरंटाईन व्हावे. प्रशासनाला माहिती दयावी. गर्दीमध्ये जाण्याचे टाळावे. लक्षणे दिसल्यास तात्काळ दवाखान्यात उपचारासाठी जावे, असे आवाहन गटविकास अधिकारी जालींदर पठारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांनी केले.