पुणे-नगर महामार्गालगत धोकादायक पद्धतीने गॅस वाहिनीचे काम चालू असताना.
पुणे-नगर महामार्गालगत धोकादायक पद्धतीने गॅस वाहिनीचे काम चालू असताना.

वाघोली : पुणे-नगर महामार्गाच्या रस्ता रुंदीकरणाचे काम सध्या जलद गतीने सुरू असून,या रस्ता रुंदीकरणाबरोबरच आता रस्त्यालगत एका खासगी गॅस वाहिनीचे पाइप टाकण्याचे देखील काम सुरू आहे.या गॅस पाईप लाईनचे काम सुरू असताना धोकादायकरीत्या रस्त्याच्या कडेला पाईप टाकून क्रेनच्या साह्याने पाईप उचलून ते पाईप एकमेकांना जोडण्याचे काम केले जात आहे.पुणे नगर रोड हा अतिशय वाहतुकीचा रोड असून या चालू कामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने कुठल्याही प्रकारची खबरदारी गॅस कंपनी व संबंधित कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडून घेतलेली दिसत नाही.

वाघोली : पुणे-नगर महामार्गाच्या रस्ता रुंदीकरणाचे काम सध्या जलद गतीने सुरू असून,या रस्ता रुंदीकरणाबरोबरच आता रस्त्यालगत एका खासगी गॅस वाहिनीचे पाइप टाकण्याचे देखील काम सुरू आहे.या गॅस पाईप लाईनचे काम सुरू असताना धोकादायकरीत्या रस्त्याच्या कडेला पाईप टाकून क्रेनच्या साह्याने पाईप उचलून ते पाईप एकमेकांना जोडण्याचे काम केले जात आहे.पुणे नगर रोड हा अतिशय वाहतुकीचा रोड असून या चालू कामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने कुठल्याही प्रकारची खबरदारी गॅस कंपनी व संबंधित कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडून घेतलेली दिसत नाही.एकीकडे रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरु असतानाच आता गॅस पाइपलाइच्या कामामुळे वाहतूक कोंडीत देखील वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्य वाहनचालकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.या गॅस वहिनीच्या कामामध्ये कसल्याही प्रकारचे शासनाचे सुरक्षिततेचे नियम पाळले जात नसून ते नियम धाब्यावर असल्याचे हवेली तालुका पंचायत समितीचे सदस्य सर्जेराव वाघमारे यांनी सांगितले.वाघमारे म्हणाले या पुणे-नगर महामार्गालगत चाललेल्या गॅस वाहिनीचे कामाची पूर्णतःहा चौकशी करून हे परवानगीने चालले आहे का? याबत माहिती मागविणार आहोत.तसेच संबंधित अधिकारी,कंत्राटदार सुरक्षिततेचे नियम पाळत नसल्याची तक्रार संबंधित विभागाकडे करणार असल्याचे वाघमारे यांनी माहिती देताना सांगितले.

दोनच दिवसापूर्वी राजस्थान मधील पाली जिल्हात  अशाच प्रकारे गॅस पाईपलाईनचे काम सुरू असताना.क्रेनच्या साह्याने उचलेला पाईप अचानकपणे बस मध्ये  घुसल्याने मोठा अपघात झाला.आणि या अपघातात दोन जणांना आपला जीव देखील गमवावा लागला तर १२ जण गभीर जखमी झाले.पुणे-नगर महामार्ग देखील वाघोली,लोणीकंद,सणसवाडी, शिक्रापूर मध्ये सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी देखील खबरदारी घेतली जात नाही त्यामुळे संबंधित विभाग अपघात होण्याची वाट पाहत आहे काय असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

पुणे-नगर महामार्ग रस्त्याचे काम चालू असल्याने वाहतूक कोंडी होऊन अपघात घडू नयेत म्हणून या संबंधित गॅस वाहिनीचे काम सुरक्षिततेच्या दृष्टीने थांबविण्यात आले आहे.या कामाची परवानगी आहे परंतु सुरक्षिततेच्या सर्व सूचनांचे पालन करण्यात संबंधित अधिकारी,कंत्राटदार यांना सांगितले आहे.

-मिलींद बारभाई,अभियंता-सार्वजनिक बांधकाम विभाग

“पाइपलाइचे जे काही काम चालु आहे यामध्ये अनेक नियम पायदळी तुडवले जाता आहे,यामध्ये मोठा आपघात होउ शकतो,त्यामुळे अशा नियमबाह्य काम करणाऱ्या ठेकेदार व कंपनीवर गुन्हे दाखल करणार आहे.”
  -संदिप सातव,सरचिटणीस-भाजपा युवा मोर्चा पु.जि.