धोकादायकरित्या गॅस चोरी; यांचा प्रताप पाहून पोलिसही घाबरले

एच.पी. कंपनीच्या १५ टनर टँकरमधून धोकादायकरित्या कनेक्टरच्या सहाय्याने गॅस चोरणाऱ्या दोघांना पोलीसांनी अटक केली. त्यांचा एक साथीदार पसार आहे. त्यांच्याकडून ३४ लाख ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. ३) पहाटे इंदोरी टोलनाक्याजवळ करण्यात आली.

    पिंपरी : एच.पी. कंपनीच्या १५ टनर टँकरमधून धोकादायकरित्या कनेक्टरच्या सहाय्याने गॅस चोरणाऱ्या दोघांना पोलीसांनी अटक केली. त्यांचा एक साथीदार पसार आहे. त्यांच्याकडून ३४ लाख ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. ३) पहाटे इंदोरी टोलनाक्याजवळ करण्यात आली.

    गुरूदीप महलसिंग संधू (वय ३१, रा. अमृतसर, पंजाब), रमेश ठक्कराम मंजू (वय २१, रा. येलवाडी, ता. खेड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांचा एक साथीदार पळून गेला आहे.

    शनिवारी पहाटे चारच्या सुमारास आरोपी येलवाडी गावच्या हद्दीतील इंदोरी टोलनाक्याजवळ एचपी कंपनीच्या १५ टन कॅप्सूल मधून गॅस सिलींडर टाकीमध्ये कनेक्टरच्या सहाय्याने धोकादायकरित्या गॅसची चोरी करीत होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करून आरोपी गुरुदीप आणि रमेश या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ३४ लाख ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींचा तिसरा साथीदार अंधाराचा गैरफायदा घेऊन पळून गेला. चाकण पोलिस तपास करत आहेत.