दौंड पंचायत समिती सभापती, उपसभापती व सदस्यांचे सी.एम.केअरला आर्थिक मदत

दौंड : दौंड पंचायत समितीचे सभापती, उपसभापती व सर्व सदस्यांनी आपले दोन महिन्यांचे मानधनाचा ६० हजार रुपयांचा धनादेश बुधवार (ता.२०) रोजी तहसीलदार यांच्याकडे देण्यात आला. सध्या देशात व राज्यात

 दौंड : दौंड पंचायत समितीचे सभापती, उपसभापती व सर्व सदस्यांनी आपले दोन महिन्यांचे मानधनाचा ६० हजार रुपयांचा धनादेश बुधवार (ता.२०) रोजी तहसीलदार यांच्याकडे देण्यात आला. सध्या देशात व राज्यात मुंबई व पुणे शहरात कोरोना कहर केला आहे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात लॉकडाऊन असल्याने राज्याची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे, राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने सरकारला मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत आहे, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री सी.एम.केअर मध्ये आर्थिक मदतीचे आव्हान केले होते, यावेळी अनेकांनी आपल्या आर्थिक कुवतीनुसार सी.एम.केअर खात्यात पैसे जमा करत आहेत, तसेच काही नागरिक आरोग्य सेवा करून तर काही गरजूंना अन्नदान करून वेगवेगळ्या मार्गाने मदत करत आहेत,

दरम्यान, दौड तालुका पंचायत समिती सभापती सौ आशा ताई शितोळे यांचे दोन महिन्याचे मानधन वीस हजार, उपसभापती नितीनभाऊ दोरगे यांचे १६ हजार व सर्व सदस्यांचे २४ हजार असे एकूण ६० हजार रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीला धनादेश स्वरूपात तहसीलदार श्री पाटील साहेब यांच्याकडे जमा केले. याप्रसंगी सभापती सौ आशाताई शितोळे, उपसभापती नितीन दोरगे, गटविकास अधिकारी गणेश मोरे साहेब, माजी उपसभापती प्रकाश नवले, विकास कदम, नितीन शितोळे, प्रदीप देवकाते उपस्थित होते.