परतीचा पाऊस माशांच्या मुळावर ; पावसाच्या पाण्याबरोबर प्रदूषित पाणी वाहून आल्याने विहिरीत मृत माशांचा खच

कुरकुंभ : कुरकुंभ (ता. दौंड) येथील औद्योगिक वसाहती तील कंपन्यांनी परतीच्या पावसाच्या पाण्यात दूषित पाणी सोडल्याने ते पाणी ओढ्याद्वारे परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरीत मिसळल्याने विहिरीतील मासे मृत्यू पावल्याचे शेतकरी महादेव गिरमे यांनी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे परिसरातील नागरिक या कंपन्यांच्या प्रदूषणाने आणि सततच्या होणाऱ्या आग व अपघाताच्या घटनांनी हैराण झाले आहेत.

१० जून २०२० रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी कुरकुंभ औद्योगिक वसाहतीच्या कार्यालयात बैठक घेतली होती त्यात काही शेतकऱ्यांनी हजेरी लाऊन येथील कंपन्याच्या जल आणि वायू प्रदूषणाची तक्रार केली.त्यांच्या तक्रारीची दखल घेत शेतकऱ्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही प्रदूषण बाधित शेतीचा प्रत्यक्ष पाहणी अहवाल तयार करून आणि या दुषित पाण्याचा तज्ञ संस्थेचा (निरीचा)तपासणी अहवाल आल्यावर निर्णय घेवू असे सांगितले होते. परंतु त्याबाबत काय निर्णय झाला की त्या आदेशालही नेहमीप्रमाणे केराची टोपली दाखवली हे गुलदस्त्यात आहे.

येथील बेजबाबदार कारखानदार कुठल्याही कायद्याला आणि आदेशाला भीत नसल्याचे चित्र आहे.कारवाई करणाऱ्यांचे हात कशाने बांधले या बाबतची नागरिकांपुढे प्रश्न चिन्ह आहे. नावापुरती तात्पुरती कारणे दाखवा नोटिसा काढून वेळ मारून नेत आहेत.आता पर्यावरण
कायद्याची पायमल्ली करणाऱ्या कारखानदारांवर कागदी घोडे न नाचवता कडक कारवाई करावी एवढीच अपेक्षा उरली आहे.