मृत व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह

तळेगाव दाभाडे : येथे एक व्यक्ती जास्त आजारी असल्याने त्यांना तातडीने डॉ. भाऊसाहेब सरदेसाई ग्रामीण रुग्णालयात अतिदक्षता विभागात दि.२४ रोजी दाखल केले व त्याचेवर उपचार चालू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. लागलीच त्यांचा स्वॅब टेस्ट करण्यासाठी पाठविला.

 एकूण ७ नातेवाईक व डॉक्टर, परिचारिका कॉरंटाइन

 

तळेगाव दाभाडे :           येथे एक व्यक्ती जास्त आजारी असल्याने त्यांना तातडीने डॉ. भाऊसाहेब सरदेसाई ग्रामीण रुग्णालयात अतिदक्षता विभागात दि.२४ रोजी दाखल केले व त्याचेवर उपचार चालू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. लागलीच त्यांचा स्वॅब टेस्ट करण्यासाठी पाठविला. व मृत व्यक्तीस शवागृहात ठेवण्यात आले. दि.२६ रोजी त्या व्यक्तीची स्वॅब टेस्टचा चाचणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला.त्यामुळे रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व अन्य संपर्कातील व्यक्ती या सर्वाना क्वारेंटाइन करण्यात आले असल्याची माहिती तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी डॉ. प्रवीण कानडे यांनी दिली.

 
         गेली दहा दिवसापूर्वी मुंबई चेंबूर येथून येथील फ्लोरासिटी या गृह प्रकल्पामध्ये हि व्यक्ती आली होती. काही दिवस राहिल्या नंतर त्या व्य्क्तीस ताप, खोकला,सर्दी याचा त्रास जाणवू लागला. यामुळे ती व्यक्ती आजारी असताना त्यांना चक्कर येणे सुरु झाले म्हणून त्यांना उपचारासाठी डॉ. भाऊसाहेब सरदेसाई ग्रामीण रुग्णालयात अतिदक्षता विभागात दि.२४ रोजी दाखल केले. उपचार करताना त्याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला.
        दरम्यान त्यावेळी  त्यांचा स्वॅब टेस्ट करण्यासाठी पाठविला. त्याचा चाचणी अहवाल मृत्यू नंतर दि. २६ रोजी  कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्याचे एकून ७ नातेवाईक व रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व अन्य संपर्कातील व्यक्ती या सर्वाना संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून तळेगाव दाभाडे शहरात कोरोनाची लागण होऊन मृत्यू झाल्याची हि पहिली व्यक्ती असल्याची माहिती मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी दिली.