ऑक्सिजनअभावी ३ रुग्णांचा मृत्यू ; हॉस्पिटलने हलगर्जीपणा केल्याचा नातेवाईकांचा आरोप

ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याची आरोप करीत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. काही काळ वातावरण तणावग्रस्त झाले. यानंतर काही वेळाने येथे यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, दौडचे तहसीलदार संजय पाटील हे येथे येऊन त्यांनी परिस्थिती हाताळून त्वरित नियंत्रणाखाली आणली. डॉक्टर यांनी मयताच्या नातेवाईक याना पैसे परत केले. काही नातेवाईक यांनी केडगाव पोलीस चौकीत जाऊन गोधलं घातला. यवत पोलीस ठाण्यात तक्रार करण्याबाबत विचारणा केली. रात्री उशिरा रुग्णाच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतले. दिवसभर हॉस्पिटल परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

  यवत :दौंड तालुक्यातील केडगाव येथील मोहन जनरल हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन अभावी ३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांनी आरोप करीत चांगलाच गोंधळ घातला आहे. विशेष बाब म्हणजे ऑक्सिजन अभावी ३ मृत्यू होण्याच्या काही तास अगोदर तेथील डॉ.मोहन यांचे विनंती वरून बुधवारी(दि.२८) रोजी त्या रुग्णालयास तातडीने ६० सिलिंडर दौंड प्रशासनाने पोचविले होते.

  -रुग्णालयास चांगलेच धारेवर धरले
  केडगाव बाजार पेठेत डॉ. मोहन यांचे मोहन जनरल हॉस्पिटलमध्ये कोविड सेंटर चालविले जाते. यामध्ये यवत ताम्हणवाडी आणि कर्जत जि. अहमदनगर येथील कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. यातील २६ वर्षीय कोरोनाबाधित तरुणांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याची माहिती त्याचे नातेवाईक यांनी दिली आहे. तर प्रकृती गंभीर असल्याने त्या तरुणांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासन यांचे वतीने सांगण्यात आले आहे. मात्र रुग्णाच्या नातेवाईक यांनी रुग्णालयास चांगलेच धारेवर धरून हुज्जत घातली.

  ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याची आरोप करीत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. काही काळ वातावरण तणावग्रस्त झाले. यानंतर काही वेळाने येथे यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, दौडचे तहसीलदार संजय पाटील हे येथे येऊन त्यांनी परिस्थिती हाताळून त्वरित नियंत्रणाखाली आणली. डॉक्टर यांनी मयताच्या नातेवाईक याना पैसे परत केले. काही नातेवाईक यांनी केडगाव पोलीस चौकीत जाऊन गोधलं घातला. यवत पोलीस ठाण्यात तक्रार करण्याबाबत विचारणा केली. रात्री उशिरा रुग्णाच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतले. दिवसभर हॉस्पिटल परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

  या दवाखान्याच्या वाढीव बिला बाबत ग्रामस्थ आणि रुग्णाचे नातेवाईक यांच्या सातत्याने तक्रारी येत आहेत, याबाबत चौकशी समिती नेमली जाईल.

  -संजय पाटील, तहसीलदार दौंड.