डीपी बॉक्समधील विद्युत तारांचा शॉक बसून तरूणाचा मृत्यु

अनिल डीपी बॉक्सजवळ गेला. बॉक्समधील विद्युत तारांना हात लावताच त्याला वीजेचा शॉक बसला. यात त्याचा जागीच मृत्यु झाला.

    पिंपरी: वीज महावितरणच्या डीपी बॉक्समधील विद्युत तारांना स्पर्श झाल्याने तरूणाचा मृत्यु झाला. ही घटना चिंचवड स्टेशन येथे रात्री पावणेनऊच्या सुमारास घडली. अनिल कांबळे (रा. आनंदनगर, चिंचवड) असे मृत्युमुखी पडलेल्या तरूणाचे नाव आहे. पिंपरी ठाण्याचे पोलीस निरीक्षक बडेसाहब नाईकवडे यांनी याबाबत माहिती दिली.

    रात्री पावणेनऊच्या सुमारास अनिल डीपी बॉक्सजवळ गेला. बॉक्समधील विद्युत तारांना हात लावताच त्याला वीजेचा शॉक बसला. यात त्याचा जागीच मृत्यु झाला. मात्र, डीपी बॉक्सजवळ अनिल नेमका कशासाठी गेला होता हे समजू शकले नाही. माहिती मिळताच वीज महावितरणच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. पिंपरी पोलीसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. तपासात जे निष्पन्न होईल त्यानुसार, योग्य कारवाई केली जाईल, असे नाईकवडे यांनी सांगितले. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.