प्राॅपर्टीच्या वादातून झालेल्या मारहाणीत वृध्दाचा मृत्यू

शिरूर : शिरूर येथील वडिलोपार्जित प्राॅपर्टीच्या वादातून ७० वर्षीय वृद्ध इसमाचा मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीनुसार शिरुर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात

शिरूर : शिरूर येथील वडिलोपार्जित प्राॅपर्टीच्या वादातून ७० वर्षीय वृद्ध इसमाचा मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीनुसार शिरुर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रविण खानापुरे यांनी दिली.
 
याबाबत शिरूर पोलीसांनी दिलेली माहिती अशी की,मकबूल अब्दुल रहिमान खान वय ७० असे या घटनेत मयत झालेल्या इसमाचे नाव असून याप्रकरणी त्यांचा मुलगा अब्दुल जहिर मकबूल खान  वय ४२ रा.कापडबाजार , शिरुरयाने शिरुर पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार फिर्यादीचे आईचे वडिलोपार्जित शिरुर शहरात वेगवेगळ्या २८ ठिकाणी असणाऱ्या प्राॅपर्टीचा शिवाजी नगर न्यायालयात वाद चालू असुन ‌आज रविवार दि. १४ रोजी सकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी,त्याचे वडील मकबूल,पत्नी रेश्मा,बहिण खालेदा इलियास शेख, फहिमीदा मतीन खान असे कापड बाजार येथील इलियासी मंजिल या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर  गेले होते.त्यावेळी त्यांनी दरवाजा उघडण्यासाठी आवाज दिला असता त्यांचा हक्क असुनही त्या ठिकाणी येऊ नये म्हणून यातील आरोपी जाफर रहिम खान व मोसिन नासिरखान पठाण यांनी फिर्यादी चे वडिल मकबूल अब्दुल रहिम खान यांना डोक्यामध्ये काठीने मारहाण करुन खुन केला व फिर्यादी , त्याची पत्नी, व बहिण यांना आरोपी जाफर रहिम खान,मोसिन नासिरखान पठाण,रमजान उर्फ टिपु आदम  पटेल, तस्सवुर उर्फ सलमान ताहिर अली शेख यांनी हाताने मारहाण करुन शिवीगाळ केले बाबत  फिर्यादी अब्दुल जहिर मकबूल खान  यांनी तक्रार दिल्याने   शिरुर पोलिस ठाण्यात खुन करून धमकी,शिवीगाळ केले बाबत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी  तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रविण खानापूरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस  निरीक्षक बिरदेव काबुगडे करित आहेत.