१० हजारांचा हप्त्याची मागणी करत जीवे मारण्याची धमकी

प्रकाश सोलंकी दुकानात बसले होते. त्यावेळी आरोपी दुकानात आले. महिन्याला दहा हजार रुपये हप्ता दे नाहीतर तुला खल्लास करून टाकीन, अशी धमकी दिली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

    पिंपरी: फर्निचरच्या दुकानात येऊन जीवे मारण्याची धमकी देत प्रत्येक महिन्याला १० हजार रुपयांचा हप्ता देण्याची मागणी केली. वाकड हिंजवडी रोडवर मानकर चौक येथे घडला. तुषार मानकर, प्रदीप जगताप (दोघे रा. कस्पटे वस्ती, वाकड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत हिम्मत चैनाराम सोलंकी (वय ३४, रा. कस्पटे वस्ती, वाकड) यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोलंकी यांचे मानकर चौकात व्ही एस फर्निचर नावाचे दुकान आहे. शुक्रवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास फिर्यादी आणि त्यांचा मोठा भाऊ प्रकाश सोलंकी दुकानात बसले होते. त्यावेळी आरोपी दुकानात आले. महिन्याला दहा हजार रुपये हप्ता दे नाहीतर तुला खल्लास करून टाकीन, अशी धमकी दिली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.