जीवे मारण्याची धमकी ; महिलेसह चार जणांवर इंदापूरात गुन्हा दाखल

इंदापूर: निमगाव केतकी (ता.इंदापूर) येथे जुन्या भांडणाच्या वादातून भावजय व तीन पुतण्यांनी मिळून सख्खे चुलते उत्तम जगनाथ नाळे (वय ५८) रा. निमगाव केतकी (नाळे वस्ती)ता.इंदापूर,जि.पूणे यांना

इंदापूर:  निमगाव केतकी (ता.इंदापूर) येथे जुन्या भांडणाच्या वादातून  भावजय व तीन पुतण्यांनी मिळून सख्खे चुलते उत्तम जगनाथ नाळे (वय ५८) रा. निमगाव केतकी (नाळे वस्ती)ता.इंदापूर,जि.पूणे यांना त्याच्या मुलासह संपवून टाकण्याची धमकी दिल्याची फिर्याद उत्तम नाळे यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात दिली असून आरोपी विरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहीती ठाणे अंमलदार शंकर वाघमारे यांनी दिली.

 
 
 राम हणूमंत नाळे, लक्ष्मण हणूमंत नाळे, विशाल अंकुश नाळे व )सुनिता अंकुश नाळे सर्व रा.निमगाव केतकी(नाळे वस्ती) ता.इंदापूर,जि.पूणे अशी आरोपींची नावे असुन दिनांक २२ एप्रिल २०२० रोजी फिर्यादी यांना वरील १ ते ३ आरोपींनी लोखंडी गज,कोयता व दगडाने शेतीच्या वादातुन जबर मारहान करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता.त्यावेळी फिर्यादी हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना इंदापूर येथील खासगी दवाखाण्यात दाखल करण्यात आले होते.तर याबाबतची फीर्याद इंदापूर पोलीसात उत्तम नाळे यांनी दिलीहोती.सदर गुन्ह्यात वरील आरोपींना अटक होऊन आरोपी कोर्टातुन जामीनावर सुटुन बाहेर आलेले आहेत
 
           आरोपी जामीनावर बाहेर सुटुन आल्यापासुन त्यांनी फिर्यादी यांना पुन्हा त्रास देण्यास सुरूवात केली असुन दिनांक २०मे २०२० रोजी सायंकाळचे सुमारास वरील १ ते ४ आरोपींनी फिर्यादी उत्तम नाळे यांना घराजवळ अडवुन जुण्या भांडणाच्या वादाचा राग मनात धरून तु आमचे विरूद्ध खोटा गुन्हा दाखल केला आहे.त्यावेळेस तुला कमी मारले आहे.आता तुला व तुझ्या मुलाला संपवुन टाकु असा दम दीला व तुझ्याविरूद्ध महीलेची छेडछाड काढल्याचा खोटा गुन्हाही दाखल करू अशी धमकी दीली असल्याची  फिर्याद उत्तम जगनाथ नाळे यांनी इंदापूर पोलीसात दीली असुन पोलीसांनी आरोपी विरूद्ध गून्हा दाखल केला असुन पुढील तपास इंदापूर पोलीस करत आहेत.