दिलासादायक! पुण्यात बाधितांच्या संख्येत घट ; गेल्या २४ तासांत ७०९ नवे रुग्ण

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रूग्णालयांमध्ये सध्या ४ हजार ५ जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत. तर गंभीर रूग्ण संख्याही १ हजार २९१ इतकी आहे़. शहरात आत्तापर्यंत २४ लाख ३६ हजार ४४६ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली

    पुणे: कोरोनाबाधितांची संख्या या आठवड्यात चौथ्यांदा एक हजाराच्या आत आली असून, रविवारीही ७०९ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर २ हजार ३२४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. रविवारी पुण्यातील सक्रिय रूग्णसंख्या १० हजारपर्यंत आली असून, सध्या शहरात १० हजार ६७६ सक्रिय रूग्ण आहेत. आज दिवसभरात ९ हजार ५६ जणांनी तपासणी करण्यात आली. तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ७.८३ टक्के इतकी आहे़. दिवसभरात ६० जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी २१ जण पुण्याबाहेरील आहेत. आजचा शहरातील मृत्यूदर हा १.७१ टक्के इतका आहे़.
    पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रूग्णालयांमध्ये सध्या ४ हजार ५ जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत. तर गंभीर रूग्ण संख्याही १ हजार २९१ इतकी आहे़. शहरात आत्तापर्यंत २४ लाख ३६ हजार ४४६ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ६५ हजार ६२५ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ४६ हजार ९४२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत शहरात ८ हजार ७ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.