उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विकास अनाथ आश्रमासाठी व्हॅनचे लोकार्पण

विकासभाऊ साने सोशल फाउंडेशनच्यावतीने चिखली (ता.हवेली) येथील विकास अनाथ आश्रमासाठी व्हॅनचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले. पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हेाते.

    पुणे : विकासभाऊ साने सोशल फाउंडेशनच्यावतीने चिखली (ता.हवेली) येथील विकास अनाथ आश्रमासाठी व्हॅनचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले.

    पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हेाते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, विकास साने, आश्रमाचे व्यवस्थापक माऊली हरकळ, प्रवीण पिंजन आदी मान्यवर उपस्थित होते.

    विकास सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून चालविण्यात येत असलेल्या विकास अनाथ आश्रमासाठी अनाथ विद्यार्थ्यांच्या सेवेत ही व्हॅन दाखल होत आहे.